2004 नंतर कंबोडियातील विष्णूच्या मुर्तीचे शिर बदलले आहे का?

False Tourism आंतरराष्ट्रीय

(संग्रहित छायाचित्र )

सोशल मीडियावर एका मुर्तीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोच्या संदर्भात 2004 नंतर कंबोडिया येथील विष्णूच्या मुर्तीचे शिर बदलले आहे असे लिहिले आहे. फॅक्ट क्रिसेंडोने यासंदर्भात केलेली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

या पोस्टमध्ये श्रीविष्णूच्या मुर्तीचा एक फोटो असून, त्या फोटोसंदर्भात 1984 मध्ये लुटारुंनी या श्रीविष्णूच्या मुर्तीचे तोडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला असे म्हटले आहे. हे शीर तुटून जेव्हा भूमीवर पडले तेव्हा त्या लुटारुंना मुर्तीचे पडलेले शीर भूमीवरुन उचलताच येत नव्हते. त्यामुळे त्यांना शीर तेथेच सोडून जावे लागले. त्यानंतर 2004 पर्यंत हे शीर येथील संग्रहालयात ठेवण्यात आले. त्यानंतर 2004 नंतर श्रीविष्णूच्या मुर्तीचे शिर बदलण्यात आले आहे.

सत्य पडताळणी

या पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेजने सर्च केले. फोटोमध्ये दाखविण्यात आलेली मुर्ती कंबोडियामधील अंगकोर वाट येथील प्राचीन मंदिरातील आहे. या मंदिराबद्दल कंबोडिया सरकारच्या अधिकृत पर्यटन वेबसाईटवर माहिती शोधली.

कंबोडिया सरकारच्या अधिकृत पर्यटन वेबसाईटवर अ‍ॅन इनसाईडर्स गाईड टू अंकोर आर्कोलॉजिकल पार्क येथे क्लिक केले. अंगकोर पुरातत्व पार्क याचा समावेश युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले अंगकोर पार्कमध्ये अनेक लहान-मोठी हिंदू – बौद्ध मंदिर आहेत. अंगकोर पुरातत्व पार्कला हे कंबोडियातील स्थानिक लोक अंगकोर वाट असे म्हणतात. या मंदिराचा परिसर 400 किलोमीटरचा आहे. या परिसरातील मंदिर 09 व्या ते 15 शतकाच्या दरम्यान खेम राजाच्या साम्राज्यातील आहेत.

टुरिझम कंबोडियाअर्काईव्ह

या अंगकोर पुरातत्व पार्कमध्ये दोन विशेष भाग करण्यात आले आहेत.

  1. अंगकोर वाट
  2. अंगकोर थोम

अंगकोर वाट – अंगकोर वाट परिसरात 12 व्या शतकातील हिंदू मंदिरे आहेत. या मंदिरांचा समावेश युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश आहे.

अंगकोस थोम – अंगकोर थोम परिसरात पाच विशेष मंदिरे असून, 16 व्या शतकानंतर बुद्ध मुर्तीचा समावेश करण्यात आला आहे.

टुरिझम कंबोडियाअर्काईव्ह

युनोस्कोच्या वेबसाईटवर देखील अंगकोर वाट आणि अंगकोर थोम याबद्दल माहिती देण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर माहिती वाचू शकता.

युनोस्कोअर्काईव्ह

पोस्टमध्ये 2004 नंतर विष्णूच्या मुर्तीचे शिर बदलण्यात आले आहे असा दावा करण्यात आला आहे. परंतू अंगकोरवाट या परिसरातील मुर्ती आणि मंदिरे हे 09 ते 15 शतकातील आहेत. त्यामुळे 2004 नंतर अंगकोरवाट परिसरातील श्रीविष्णूच्या मुर्तीचे शिर बदलण्यात आलेले नाही.

कंबोडियात 2004 नंतर अंगकोर वाट संदर्भात नेमके घडले तरी काय?

कंबोडियामध्ये अंगकोर वाट आणि अंगकोर थोम या विषयी संरक्षण विषयक कायदा करण्याच्या उद्देशाने विविध कायदेशीर बाबींची पुर्तता करण्याचे काम 1994 पासून सुरु झाले. यामध्ये अप्सरा नॅशलन अथॉरिटी (APSARA Angkor Region) अंतर्गत अंगकोर पार्कच्या संरक्षणासाठी प्राधिकरण आणि अंगकोर विभागाचे व्यवस्थापन यासंदर्भातील निर्णय एसएसआर सरकारच्या काळात संमत झाला. 2004 ते 2009 या काळात संरक्षित क्षेत्र 1 आणि संरक्षित क्षेत्र 02 मालकी आणि इमारत कोड स्पष्ट करण्यासाठीची कारवाई करण्यात आली. 2012 पर्यंत अंगकोर पुरातत्व पार्कच्या संरक्षण संदर्भातील सर्व कायदेशीर कारवाई पुर्ण झाली.

युनोस्कोअर्काईव्ह

अंगकोर वाट या संदर्भात नॅशनल जिओग्राफिक वेबसाईटवर माहितीचा व्हिडिओ उपलब्ध आहे. तसेच नॅशनल जिओग्राफिक युट्युब चॅनलवर अंगकोर पार्क संदर्भातील व्हिडिओ 13 ऑक्टोबर 2018 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्येही अंगकोर वाट येथील मंदिरे ही 09 व्या ते 15 व्या शतकातील खेम राजाच्या काळातील आहेत असे म्हटले आहे.  

पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या श्रीविष्णूच्या मूर्तीचे शीर 2004 नंतर बदलले नाही. कारण अंगकोर वाट आणि अंगकोर थोम या परिसरातील मंदिरे ही 09 व्या ते 15 व्या शतकातील आहेत.

निष्कर्ष :  पोस्टमध्ये 2004 नंतर श्रीविष्णूच्या मूर्तीचे शीर बदलण्यात आले आहे हा दावा असत्य आहे.  

Avatar

Title:2004 नंतर कंबोडियातील विष्णूच्या मुर्तीचे शिर बदलले आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False