व्हिडिओमधील मुलगी किशोर कुमारची नात नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक मुलगी “दीवान हुआ बादल” हे गीत गातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गाण गाणारी मुलगी अमित कुमारची मुलगी आणि किशोर कुमारची नात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले आहे की, व्हायरल व्हिडिओमधील गीत गाणारी मुलगी किशोर कुमारची नात नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी “दीवाना हुआ बादल” हे गीत गात आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “किशोर कुमार यांची नात. अमित कुमार यांची मुलगी. नक्की ऐका.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीवडर्स सर्च केल्यावर युट्युबवर हा व्हिडिओ 18 सप्टेंबर 2020 रोजी अपलोड केलेला आढळला. व्हिडिओसोबत कॅप्शमध्ये लिहिलेले होते की, “दीवाना हुआ बादल बाय अनन्या सबनीस.”
हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकतात.
पुढे अधिक शोध घेतल्यावर अनन्या सबनीसचे अधिकृत फेसबुक अकाउंट आढळले त्यामध्ये त्या एक व्यावसायिक गायक असल्याचे कळाले.
फॅक्ट क्रेसेंडोने अनन्या सबनीसच्या गुरू उषा टिमोथी यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, “अनन्या सबनीस माझीच शिष्या आहे, ती एक महाराष्ट्रीय मुलगी असून तिचा किशोर कुमार यांच्याशी काही संबंध नाही.”
या वरुन स्पष्ट होते की, या व्हिडिओमधील मुलगी अमित कुमारची मुलगी आणि किशोर कुमारची नात नाही.
किशोर कुमार यांची नात कोण ?
किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना दोन मुली आहेत. त्यांची वृंदा (27) आणि मुक्तिका (18) अशी नावे आहेत. या दोन्ही मुली देखील गायिका आहेत.
पुढे आम्हाला अमित कुमार गांगुली यांच्या अधिकृत युट्युब अकांउटवर 2015 मध्ये गायिका मुक्तिका गांगुलीच्या पहिल्या गाण्याच्या अल्बम “बाबा मेरे” लाँचचा व्हिडिओ सापडला.
तसेच अमित कुमार यांनी 3 मे 2019 रोजी आपल्या अधिकृत फेसबुक अकांउट वरुन वृंदा गांगुलीच्या सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
खालील तुल्नात्मक फोटो पाहिल्यावर आपल्याला कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील गाणे गाणारी मुलगी अनन्या सबनीस असुन किशोर कुमार यांची नाती वृंदा आणि मुक्तिका नाहीत.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये गीत गाणाऱ्या मुलीचे नाव अनन्या सबनीस किशोर कुमार यांची नात नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:व्हिडिओमधील मुलगी किशोर कुमारची नात नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल
Written By: Sagar Rawate
Result: False