कोरोनामुळे UPSC, MPSC परीक्षा रद्द करण्यात आलेली नाही; वाचा सत्य

Coronavirus False

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. त्यातच आता यूपीएससी, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. ही माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका स्क्रीनशॉटसह पसरत आहे. 

युपीएससी, एमपीएससीची परीक्षा खरोखरच रद्द करण्यात आली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता ही अफवा असल्याचे कळाले.

screenshot-www.facebook.com-2020.04.17-1.png

फेसबुकवरील मूळ पोस्टअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत का? याची माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यात आलेल्या एका बैठकीचे 15 एप्रिल 2020 रोजीचे प्रसिद्धीपत्रक आम्हाला दिसून आले. या प्रसिद्धीपत्रकात कुठेही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे म्हटलेले नाही. 

UPSC-1.png

मूळ प्रेस नोट येथे वाचा – UPSC Press Note

प्रसिद्धीपत्रकानुसार, सिव्हिल सर्विसेस परीक्षेच्या पर्सनॅलिटी टेस्टीच्या नव्या तारखा 3 मे नंतर घोषित करण्यात येतील. ज्या परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत, त्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला तर तशी अधिकृत माहिती UPSC वेबसाईटवर देण्यात येईल. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)  वेबसाईटवरदेखील परीक्षा रद्द करण्यात आल्याची अथवा वयोमर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याची कोणतीही माहिती आढळली नाही. त्यानंतर पत्र व सूचना कार्यालयानेसुद्धा (PIB) ट्विटरवर परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती असत्य असल्याचे म्हटले आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आल्यास ते लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल, असेही याठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे.

Archive

निष्कर्ष

यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत.  पत्र सूचना कार्यालयाकडून याबाबतचा खूलासा करण्यात आलेला आहे.

Avatar

Title:कोरोनामुळे UPSC, MPSC परीक्षा रद्द करण्यात आलेली नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False