सांगलीमध्ये कथित ‘बच्चा चोर’ साधूंवरील हल्ल्याचा म्हणून मध्य प्रदेशमधील व्हिडिओ व्हायरल
सांगली जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवणारी टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली. यानंतर 14 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर साधूंना मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.
अशाच एका व्हिडिओमध्ये भगवे कपडे परिधान केलेल्या काही जणांना काठ्यांनी मारले जात आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातील घटनेचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. हा व्हिडिओ गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमधील झालेल्या मारहाणीचा आहे.
काय आहे दावा?
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम तर या व्हिडिओतील भाषा सांगली, महाराष्ट्रातील वाटत नाही. लोक हिंदीतून ओरडत आहेत. मग या व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून IBC24 नामक युट्यूब चैनलवरील 8 ऑगस्ट रोजीची एक बातमी आढळली. या बातमीत हा व्हिडिओ मध्यप्रदेशमधील असल्याचे म्हटले आहे.
बातमीनुसार, भोपाळजवळील रायसेन जिल्ह्यातील पलोहा गावात साधूच्या वेशात 6 लुटेरे आले होते. त्यांनी गावातील एका महिलेच्या घरी चोरी केली व निघून गेले.
अमर उजालाच्या बातमीनुसार, महिलेने गावकऱ्यांनी याबाबत माहिती दिल्यावर या टोळीचा शोध घेण्यात आला. हे सहा जण नजीकच्याच पिपलिया गज्जू गावात असल्याची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी तेथे जाऊन साधूच्या वेशातील टोळीला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सहा जण उत्तरप्रदेशमधील चित्रकूट येथील आहे. मारहाणीत जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर स्थानिक दवाखान्यात उपचार करण्यात आले.
सांगलीमध्ये काय घडले?
एबीपी माझानुसार, सांगलीच्या लवंगा गावात मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते.
स्थानिक गावकऱ्यांना त्यांची भाषा न समजल्याने लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला व त्यांनी लहान मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून चारही साधूंना मारहाण केली. ही घटना 13 सप्टेंबर रोजी (मंगळवारी) दुपारच्या सुमारास घडली.
लवंगा येथील 6 जणांना उमदी पोलिसांनी अटक करून 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी परराज्यातील संशयीत व्यक्तीबाबत संशय आल्यास कायदा हातात कोणी न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, सांगलीमध्ये लहान मुले पळवणारी टोळी समजून मारहाण झालेल्या साधूंचा व्हिडिओ म्हणून मध्य प्रदेशातील घटनेचा एक महिना जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:सांगलीमध्ये कथित ‘बच्चा चोर’ साधूंवरील हल्ल्याचा म्हणून मध्य प्रदेशमधील व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Agastya Deokar
Result: Partly False