Fact Check : काँग्रेसने पुरातत्व विभागाचे अधिकारी के. के. मोहम्मद यांना निलंबित केले होते का?

False राजकीय | Political राष्ट्रीय

खोदकाम करताना मंदिर निघाले, मी म्हणालो जमीन हिंदूंना द्या पण काँग्रेसने मला निलंबित केले. पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के. के. मोहम्मद यांचे वक्तव्य अशी माहिती सुधीरभाऊ सुकारे यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के. के. मोहम्मद यांनी असे वक्तव्य केले आहे का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांचे खालील वृत्त दिसून आले.

ARCHIVE

हे व्हिडिओ पाहिल्यावरही पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के. के. मोहम्मद यांच्याबद्दल करण्यात येत असलेला दावा नेमका स्पष्ट होत नसल्याने आम्ही वेगवेगळे शब्दप्रयोग करत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची  NEWS18 HINDI  ला 31 मार्च 2017 रोजी दिलेली मुलाखत आम्हाला दिसून आली. यात त्यांनी काही माहिती दिली आहे. काँग्रेसने आपल्याला निलंबित केल्याचे मात्र त्यांनी कुठेही म्हटलेले नाही.

NEWS18 HINDI | ARCHIVE

त्यानंतर दुरदर्शनच्या वृत्तवाहिनीने म्हणजेच डीडी न्यूजने पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी डॉ. के. के. मोहम्मद यांची 15 सप्टेंबर 2018 रोजी घेतलेली मुलाखत दिसून आली. या मुलाखतीतही त्यांनी काँग्रेसने त्यांना निलंबित केल्याचे म्हटलेले नाही.

ARCHIVE

डॉ. के. के. मोहम्मद यांची संपूर्ण माहिती आम्हाला अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिसून आली. या माहितीत त्यांना निलंबित करण्यात आल्याचे कुठेही दिसत नाही. ते 2012 मध्ये निवृत्त झाल्याचे दिसून येते. ते त्यांच्या सेवा काळात कधीही निवृत्त झाल्याचे दिसून येत नाही.

ARCHIVE

याबाबतचे सत्य जाणण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने थेट पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. के. के. मोहम्मद यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकारचे विधान मी कधीही केलेले नाही. मला कधीही निलंबित करण्यात आले नव्हते.

या संशोधनातून आम्हाला असे दिसून आले की, डॉ. के. के. मोहम्मद यांनी पोस्टमध्ये दिलेली विधाने कधीही केलेली नाहीत. त्यांना त्यांच्या सेवेच्या काळात कधीही निलंबित देखील करण्यात आलेले नाही.

निष्कर्ष 

डॉ. के. के. मोहम्मद हे पुरातत्व विभागाचे एक सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी पोस्टमध्ये दिलेली विधाने कधीही केलेली नाहीत. त्यांना त्यांच्या सेवाकाळातही कधीही निलंबित करण्यात आले नव्हते. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहेत.

Avatar

Title:Fact Check : काँग्रेसने पुरातत्व विभागाचे अधिकारी के. के. मोहम्मद यांना निलंबित केले होते का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False