इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भूमिपूजनच्या दिवशी रामाच्या मूर्तीचा जलाभिषेक केला का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

आयोध्येमध्ये 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यानंतर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीसुद्धा त्यादिवशी राम मूर्तीचा जलाभिषेक केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हे फोटो जुने असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले का हा फोटो गेल्या वर्षीचा आहे.

बोरीस जॉन्सन यांनी स्वतः 19 डिसेंबर 2019 रोजी हा फोटो शेयर केला होता. सोबत लिहिले की, प्रीती पटेल यांच्यासह लंडनमधील स्वामी नारायण मंदिर आणि इस्कॉन मुख्यालयाला भेट दिली.

अर्काइव्ह

म्हणजे हा फोटो गेल्या डिसेंबर महिन्यातील आहे. ते 5 ऑगस्ट किंवा राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशीचे नाहीत.

स्वामी नारायण मंदिराच्या या भेटीचा व्हिडियोदेखील इंटरनेटवर उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, बोरीस जॉन्सन यांचे जुने फोटो चुकीच्या माहितीसह शेयर करण्यात येत आहेत. त्यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी राम मूर्तीचा जलाभिषेक केला नव्हता.

Avatar

Title:इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भूमिपूजनच्या दिवशी रामाच्या मूर्तीचा जलाभिषेक केला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •