
भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांचे खरे नाव नसीमुद्दीन खान असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कविता जोशी नावाच्या महिलेने ही पोस्ट अपलोड केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांचे खरे नाव यांचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगलवर चंद्रशेखर रावण उर्फ आझाद यांचे खरे नाव काय असे टाकले त्यावेळी आमच्या समोर खालील माहिती आली.
त्यानंतर आम्ही भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची एपीबी माझाचे दिल्लीतील प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी घेतलेली मुलाखत पाहिली. या मुलाखतीत चंद्रशेखर आझाद यांनी आपले कागदोपत्री नाव हे चंद्रशेखर आझाद असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. रावण हा शब्द आपण आता स्वत:साठी वापरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपले नाव आपल्या वडिलांनी ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आपण त्यांच्या संपूर्ण मुलाखतीतील त्यांच्या नावासंदर्भातील माहिती 7 मिनिट 56 सेकंद ते 9 मिनिट 36 सेकंद या कालावधीत पाहू शकता.
चंद्रशेखर आझाद यांना ही पोस्ट माहिती आहे का आणि त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळे आम्ही चंद्रशेखर आझाद यांच्या ट्विटर अकांऊटवर याचा शोध घेतला. त्यावेळी आम्हा आझाद यांचे खालील ट्विट आम्हाला दिसून आले. त्यात त्यांनी ही पोस्ट वाचून आपल्याला हसू आल्याचे म्हटले आहे. आपण हे ट्विट खाली पाहू शकता.
निष्कर्ष
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव चंद्रशेखर आझादच असल्याचे आणि ते त्यांच्या वडिलांनी ठेवले असल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे. चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरुनही याचा खुलासा केला आहे. चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव नसीमुद्दीन खान आहे ही बाब असत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर यांचे खरे नाव नसीमुद्दीन खान आहे का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
