Fact Check : pubg खेळल्यामुळे बेळगावमधील युवक मानसिकदृष्टया अस्वस्थ झालाय का?

Mixture सामाजिक

जास्त PUBG खेळल्याचा Effect.!  म्हणून सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणावर पब जी खेळल्याने मानसिक परिणाम झाला असून तो रस्त्यावर पबजी खेळत आहे, असा अप्रत्यक्ष दावा या पोस्टद्वारे करण्यात आला आहे. He Bagh Bhau – हे बघ भाऊ या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ 82 हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. एक हजार 100 जणांनी याला लाईक केले असून 493 जणांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

ही घटना नेमकी कुठे घडली, असे खरंच घडलंय का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. PUBG खेळल्याचा Effect असे टाकून आम्ही गुगलवर शोध घेतला असता पब जी गेमचा तुमच्या व्यक्तिमत्वावर कसा नकारात्मक प्रभाव पडतो, याची माहिती देणारे अनेक लेख आणि बातम्या दिसून आल्या.  

त्यानंतर आम्ही या व्हिडिओचा गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला पण आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. मग आम्हाला प्रश्न पडला की हा व्हिडिओ नेमका कुठला? त्याचवेळी या व्हिडिओवर नाथ पै सर्कल असे इंग्रजी लिहिले असल्याचे आम्हाला दिसून आले. नाथ पै सर्कल कुठे आहे आणि काय आहे याचा शोध घेत आम्ही http://belgaumlive.com या संकेतस्थळावर आम्ही जाऊन पोहचलो. आता या व्हिडिओचा शोध आम्ही या संकेतस्थळावर घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला या संकेतस्थळावर हा व्हिडिओ दिसून आला नाही. त्यानंतर आम्ही या संकेतस्थळाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा 8 जून 2019 रोजी हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले. या ठिकाणी हा युवक  मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे की PUBG खेळून अस्वस्थ झाला आहे हे समजू शकले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

Archive

बेळगाव लाईव्हच्या या व्हिडिओवर एक हजारहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. यात हा तरूण मानसिक रुग्ण असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ प्रसारित झाल्याने त्याच्या कुटूंबियांनीही त्रास झाल्याचे यात स्पष्ट करत असे व्हिडिओ पोस्ट करण्याआधी विचार करा असे म्हटले आहे.

Archive

बेळगाव पोलिसांच्या संकेतस्थळावरही आम्ही याची काय माहिती मिळते का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेथे आम्हाला याबाबतची कोणतीही माहिती आढळून आली नाही. त्यानंतर आम्ही स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये हे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत कोणतेही वृत्त आढळून आले नाही.

निष्कर्ष

बेळगावमधील युवक pubg खेळल्यामुळे मानसिकदृष्टया अस्वस्थ झाला असल्याचे सिध्द होत नाही. बेळगाव लाईव्ह या संकेतस्थळाच्या फेसबुक पेजवरही याबाबत ठोस दावा केलेला नाही. याबाबतचे वृत्तही या संकेतस्थळावर दिसून येत नाही. स्थानिक दैनिकांनीही याबाबत वृत्त दिलेले नाही. स्थानिक नागरिकांनी हा युवक आधीपासूनच मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या पोस्टमधील दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत संमिश्र स्वरुपाचा आढळला आहे.

Avatar

Title:Fact Check : pubg खेळल्यामुळे बेळगावमधील युवक मानसिकदृष्टया अस्वस्थ झालाय का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture