आयुष मंत्रालयात औषधांना परवानगी देणाऱ्या मुस्लिम तज्ज्ञांची यादी खोटी आहे. वाचा सत्य

Coronavirus False

आयुष मंत्रालयामध्ये औषधांच्या संशोधनाला परवानगी देणाऱ्या सहा कथित वैज्ञानिकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सर्व मुस्लिम नावे आहेत. यावरून प्रचार केला जात आहे की, या मुस्लिम तज्ज्ञांनी रामदेव बाबा यांच्या कोरोनिल औषधावर बंदी घातली.

फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हायरल मेसेज खोटा आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

आयुष मंत्रालयामध्ये औषधांवरील संशोधनाला परवानगी देणाऱ्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये असीम खान, मुनावर काजमी, खादीरुन निशा, मकबूल अहमद खान, आसिया खानुम, शगुफ्ता परवीन हे टॉप 6 वैज्ञानिक आहेत. आता समजुन घ्या की, स्वामी रामदेव यांच्या कोरोनिल औषधावर बंदी का आली आहे. (मराठी भाषांतर)

Ganeshdf.png

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

योगगुरू बाबा रामदेव यांनी सात दिवसांत पूर्णपणे कोरोना बरा करणारे आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. पंतजलीतर्फे निर्मित या औषधाचे नाव ‘कोरोनिल’ ठेवण्यात आले. परंतु, आयुष मंत्रालयाने या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, तपासणी होईपर्यंत या औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश जारी केले आहेत. यानंतर आयुष मंत्रालयाविषयी मेसेज व्हायरल होत आहेत. 

आयुष मंत्रालयात खरोखरच असे काही तज्ज्ञांचे पॅनल आहे का याचा शोध घेतला. त्यावेळी केंद्रीय पत्र व सूचना मंत्रालयाच्या फॅक्ट-चेक विभागाने सदरील व्हायरल मेसेज खोटा असल्याचा खुलासा केला आहे.

अर्काइव्ह

पीआयबीने म्हटले की, आयुष मंत्रालयाबाबत आरोप केला जात आहे की, तेथील वैज्ञानिकांच्या एक पॅनलने कोरोनावरील एका कथित औषधावर बंदी घातली आहे. परंतु, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, आयुष मंत्रालयामध्ये असे तज्ज्ञांचे पॅनल नाही. हा मेसेज खोटा आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, आयुष मंत्रालयामधील तज्ज्ञांची म्हणून जी यादी व्हायरल होत आहे ती खोटी आहे. आयुष मंत्रालयामध्ये असे कोणतेही वैज्ञानिकांचे पॅनल नाही. त्यामुळे सदरील मेसेज असत्य आहे.

Avatar

Title:आयुष मंत्रालयात औषधांना परवानगी देणाऱ्या मुस्लिम तज्ज्ञांची यादी खोटी आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False