शिवराज सिंह चौहान हात मोडल्याचे नाटक करत आहेत का? वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हात मोडल्यामुळे त्यांच्या हाताला प्लॅस्टर केलेले आहे. सोशल मीडियावर दोन फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, शिवराज सिंह चव्हाण हात मोडल्याचे नाटक करत आहेत. एका फोटोत त्यांच्या उजव्या हाताला प्लॅस्टर आहे तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या डाव्या हाताला प्लॅस्टर आहे. मग सत्य काय आहे? फॅक्ट क्रेसेंडोने ते शोधून काढले.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये शिवराज सिंह चौहान यांचे दोन फोटो दिलेले आहेत. एकात त्याच्या डाव्या हाताल तर, एकामध्ये उजव्या हाताला प्लास्टर दिसते. सोबत लिहिले की, असा चमत्कार तुम्ही कधी बघितलायं…? सकाळी उजव्या हाताला प्लास्टर, संध्याकाळी डाव्या हाताला प्लास्टर हे प्रभु बीजेपी च्या शिवराज सिंह चौहान चे दोन्ही हात लवकरात लवकर ठीक कर…

मग त्यांचा नेमका कोणता हात मोडला आहे?

तथ्य पडताळणी

शिवराज सिंह चौहान यांचा नेमका कोणता हात मोडला हे तपासण्यासाठी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शोध घेतला. तेव्हा कळाले की, त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झालेला आहे. खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यांच्या उजव्या हाताला प्लॅस्टर आहे.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी भोपाळच्या लालघाटी येथील गुफा मंदिर परिसरात सेवा भारतीतर्फे आयोजित ‘विसाल कन्या पूजन’ कार्यक्रमाला शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुलींना मार्गदर्शन व जेवणदेखील वाढले. तसेच गांधी जयंतीनिमित्त त्यांनी उमा भारती यांच्यासह स्वच्छ भारत उपक्रमात सहभाग घेऊन साफसफाई केली. व्हिडियोत स्पष्ट दिसत आहे की, शिवराज सिंह डाव्या हाताने झाडू मारत आहेत.

यावरून हे तर सिद्ध होते की, शिवराज सिंह यांचा उजवा हात फ्रॅक्चर झालेला आहे. मग व्हायरल पोस्टमधील डाव्या हाताचा फोटोचे काय?

या फोटोचे नीट निरीक्षण केल्यावर लक्षात येते की, पिवळ्या रंगाच शर्ट घातलेल्या व्यक्तीने ही सेल्फी घेतलेली आहे. मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यामध्ये मिरर मोड नावाचे एक ऑप्शन असते. ते जर ऑन करून सेल्फी घेतली तर उजव्याचे-डावे होते. खाली दोन्ही फोटोंची तुलना केल्यावर हे लक्षात येईल की, सदरील व्यक्तीने मिरर मोड ऑन ठेवून सेल्फी घेतलेली आहे. त्या फोटोला फ्लिप केल्यावर लगेच दिसते की, शिवराज सिंह यांच्या उजव्या हातालाच प्लास्टर आहे. 

शिवाय फोटो क्र. 1 मध्ये शिवराज सिंह आणि त्यांच्या भोवतीचे सुरक्षारक्षक यांच्या शर्टचा खिसा डाव्या बाजूला दिसतोय. परंतु, शर्टचा खिसा सामान्यतः उजव्या बाजूला असतो. मिरर मोड मुळे सेल्फीत असे दिसते. शिवराज सिंह यांची 30 सप्टेंबर रोजी झाबुआ येथे सभा झाली होती. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या सभेत केलेल्या भाषणाचा व्हिडियो शेयर करण्यात आलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हायरल फोटो आणि व्हिडियोमध्ये शिवराज सिंह यांचे जॅकेट सारखेच आहे. व्हिडियोत त्यांच्या उजवा हात मोडलेला दिसतो. 

निष्कर्ष

शिवराज सिंह चौहान यांचा उजवा हात मोडलेला आहे. मिरर मोड ऑन करून सेल्फी घेतल्यामुळे व्हायरल फोटोमध्ये त्यांच्या डावा हात मोडलेला दिसतो. त्यामुळे सदरील पोस्ट खोटी आहे.

Avatar

Title:शिवराज सिंह चौहान हात मोडल्याचे नाटक करत आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •