नवरदेवाने लग्नातच गुटखा खाल्ल्याने नवरी खरंच त्याला मारले का? वाचा त्या व्हिडिओचे सत्य

Satire

लग्नमंडपात बसलेली नवरी नवरदेवाला मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, लग्नविधी सुरू असतानाच नवरदेवाने गुटखा खाल्ल्यामुळे नवरी चिडली आणि तिने सर्वांसमोरच त्याला सुनावत मारले.

आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी हा व्हिडिओ शेअर करीत बातम्या प्रसिद्ध केल्या. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे.

काय आहे दावा?

साम टीव्ही मराठीने हा शेअर केला होता.

टीव्ही-9 मराठीनेसुद्धा या व्हिडिओवरून बातमी प्रसिद्ध केली होती.

मूळ बातमी – टीव्ही-9 मराठी (अर्काइव्ह)

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावरील या व्हिडिओतील कीफ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ खऱ्याखुऱ्या लग्नातील नाही. 

युट्यूबवर चंदन मिश्रा नावाच्या एका चॅनेलवर हा संपूर्ण 11 मिनिटांचा व्हिडिओ आढळला. 4 एप्रिल 2021 रोजी तो अपलोड करण्यात आला होता.

मैथिली भाषेतील हा विनोदी व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला होता. 

व्हिडिओमध्ये नवरदेवाची भूमिका करत असलेले रामलाल हे एक विनोदी पात्र आहे. या पात्राचे विविध व्हिडिओ चंदन मिश्रा नामक युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. समाजातील विविध विषयांवर विनोदाच्या माध्यामातून प्रबोधन करणे त्यांची स्टाईल आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होती की, मैथिली भाषेतील एका कॉमेडी व्हिडिओला खऱ्या लग्नाचा व्हिडिओ म्हणून शेअर केले जात आहे. गुटखा न खाण्याचा संदेश देणारा हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला होता.

Avatar

Title:नवरदेवाने लग्नातच गुटखा खाल्ल्याने नवरी खरंच त्याला मारले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Satire