नरेंद्र मोदींच्या नव्या बोईंग 777 विमानाचे म्हणून असंबंधित फोटो व्हायरल; वाचा सत्य

Partly False राजकीय | Political

पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना प्रवासासाठी दोन नवे अत्याधुनिक बोईंग 777 विमानाची खरेदी करण्यात येणार आहेत. या विमानाच्या आलिशान अंतर्गत सजावटीचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सदरील फोटो पंतप्रधानांसाठी प्रस्तावित असलेल्या विमानाचे नसल्याचे समोर आले. 

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टसंग्रहित

तथ्य पडताळणी 

पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा फोटो बोईंग 787 ड्रीमलाईन विमानातील आहे. बिझनेस इनसायडरवरील लेखानुसार, बोईंग 787 सिरीजमधील खासगी विमानाचा हा फोटो आहे. याची किंमत 200 मिलियन डॉलर असून, चीनमधील डीअर जेट कंपनीकडे या विमानाची मालकी आहे.

मूळ लेख येथे वाचा – बिझनेस इनसायडरअर्काइव्ह 

विशेष म्हणजे या विमानाची आतून रचना आणि सजावट कशी आहे याचा व्हिडियो युट्यूबवर उपलब्ध आहे. जगातील एकमेव खासगी बोईंग 787 ड्रीमलाईनर विमानातील या व्हिडियोच्या 2.12 मिनिटांपासून तुम्ही वरील फोटोतील दृश्य पाहू शकता.

मग पंतप्रधानांचे विमान कोणते?

भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना प्रवास करण्याठी नवे दोन बोईंग 777 विमान खरेदी करण्यात येणार आहेत. याची किंमत 8,458 कोटी रुपये इतकी आहे. परंतु, व्हायरल फोटो वेगळ्या प्रकारच्या विमानाचे आहेत. 

सदरील फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर केंद्रीय पत्र व सूचना मंत्रालयाकडून खुलासा करण्यात आला की, पंतप्रधानांचे आलिशान विमान म्हणून शेयर होत असलेले फोटो पंतप्रधानांच्या विमानाचे नाहीत. ते फोटो खासगी बोईंग 787 ड्रीमलाईनर विमानाचे आहेत.

अर्काइव्ह

निष्कर्ष

खासगी बोईंग 787 ड्रीमलाईनर विमानाचे फोटो पंतप्रधानांचे आलिशान विमान म्हणून शेयर होत आहेत. परंतु, हे खरं आहे की, पंतप्रधान व राष्ट्रपतींसाठी 8,458 कोटी रुपयांचे दोन नवे बोईंग 777 विमान खरेदी करण्यात येणार आहेत. 

Avatar

Title:नरेंद्र मोदींच्या नव्या बोईंग 777 विमानाचे म्हणून असंबंधित फोटो व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False