अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयाच्या संचालक मंडळात आहेत का? वाचा सत्य

False राष्ट्रीय सामाजिक

अमिताभ आणि अभिषेक बच्चन या दोघांना लक्षणंविरहित कोरोना असून ते दोघेही चांगल्या स्थितीत आहेत. त्यांच्याकडे जुहू येथे 3 बंगले असून 18 खोल्या आहेत, एक मिनी आयसीयू असलेली खोली आणि 2 डॉक्टर 24 तास उपलब्ध आहेत. एम्म्प्टोमॅटिक रूग्ण असल्याने ते सहजपणे होम क्वारंटाईनसाठी जाऊ शकले असते. पण नानावती हॉस्पिटलला ते ऍडमिट झाले. ज्येष्ठ बच्चन यांनी त्यांच्या प्रत्येक ट्वीटमध्ये नानावती हॉस्पिटल आणि डॉक्टरांचा उल्लेख व आभार मानले. ते नानावटी हॉस्पिटलचा मालक असलेल्या रेडियंट ग्रुपचा गुंतवणूकदार आणि बोर्डाचा सदस्य आहे. नानावटी हॉस्पिटल बिलांच्या मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारणीसाठी कुप्रसिद्ध आहे. 10 पैकी 7 पेशंट असे आढळून आले आहेत की, या पेशंटना नेहमीपेक्षा जास्त काळ ठेवतात. नानावटी रुग्णालयाच्या प्रतिमेच्या उन्नतीसाठी चांगली स्क्रिप्ट आणि अभिनय. असे असेल तर महानायक खरेच महानायक आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. ही माहिती खरी आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  

screenshot-www.facebook.com-2020.07.18-13_09_40.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

अमिताभ बच्चन हे रेडियंट लाइफ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत की याची माहिती घेण्यासाठी समुहाच्या संकेतस्थळास भेट दिली. 

दावा क्रमांक 1 : अमिताभ बच्चन रेडियंटच्या संचालक मंडळात आहेत.

image4.png

रेडियंटच्या संचालक मंडळात अमिताभ बच्चन यांचे नाव दिसून आले नाही. रेडियंट  ग्रुपच्या संचालकपदी संजय नायर, महेंद्र लोढा, नारायण शेषाद्री, अभय सोयी, प्रशांत कुमार आणि प्राची सिंग या सहा सदस्यांचा समावेश असल्याचे दिसून येते.

संचालक मंडळाची माहिती

त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कोर्पोरेट अफेअर्सच्या संकेतस्थळास भेट दिली. येथे असलेल्या माहितीतही अमिताभ बच्चन हे रेडियंट समूहात संचालक असल्याचे दिसून आले नाही.

image3.png

मिनिस्ट्री ऑफ कोर्पोरेट अफेअर्स 

दावा क्रमांक 2 : अमिताभ बच्चन यांच्या कोविडची लक्षणे नाहीत

नानावटी रुग्णालयाकडूनही रेडियंट लाइफ केयर किंवा नानावटी रुग्णालयाच्या संचालक मंडळात अमिताभ बच्चन यांचा समावेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनी 13 जुलै 2020 रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांना सौम्य लक्षणे दिसत आहेत. बच्चन यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. 

screenshot-marathi.abplive.com-2020.07.18-17_08_33.png

एबीपी माझा / संग्रहित

 निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, अमिताभ बच्चन यांचा समावेश रेडियंट लाईफ केयर किंवा नानावटी रुग्णालयांच्या संचालक मंडळात असल्याचे असत्य आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने आणि वय 65 वर्षापेक्षा जास्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Avatar

Title:अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयाच्या संचालक मंडळात आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False