
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ आदळलं. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर, नाशिक व पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या निसर्ग चक्रीवादळाचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडियो शेयर होऊ लागला.
फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली असात हा व्हिडियो अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी आलेल्या मायकेल चक्रीवादळाचा असल्याचे स्पष्ट झाले.
तथ्य पडताळणी
सदरील व्हिडियोबाबात सर्च केले असता, टोरंटो ट्रॅकर्स या युटूयूब चॅनलवर 12 ऑक्टोबर 2018 रोजी तो अपलोड करण्यात आल्याचे आढळले. त्यानुसार, अमेरिकेत थैमान घातलेल्या मायकेल चक्रीवादळाची ही द्दश्ये आहेत.
अमेरिकेतील WPLG 10 या स्थानिक वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनलवरही 10 ऑक्टोबर 2018 रोजी ही द्दश्ये प्रसारित करण्यात आली होती. यात 57 व्या सेकंदाला ही द्दश्ये दिसून येतात. अमेरिकेत थैमान घातलेल्या मायकेल चक्रीवादळाची ही द्दश्ये असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेतील CBS12 या संकेतस्थळाने 11 ऑक्टोबर 2018 रोजी या व्हिडियोसह दिलेल्या वृत्तातही हे द्दश्य अमेरिकेत थैमान घातलेल्या मायकेल चक्रीवादळाचे असल्याचे म्हटले आहे.

यातून हे स्पष्ट झाले की, निसर्ग चक्रीवादळाचा म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडियो दोन वर्षापूर्वी अमेरिकेत आलेल्या मायकल चक्रीवादळाचा आहे.
निष्कर्ष
निसर्ग चक्रीवादळाचा म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडियो दोन वर्षापूर्वी अमेरिकेत आलेल्या मायकल चक्रीवादळाचा आहे.

Title:अमेरिकेतील दोन वर्षापूर्वीचा व्हिडियो ‘निसर्ग’ वादळाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
