JIO FACT: मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे खरंच जिओ देणार का 399 रुपयांचे फ्री रिचार्ज?

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नुकतेच संपलेल्या आयपीएल टुर्नामेंटमध्ये मुंबई इंडियन्सने अंतिम सामना जिंकून चौथ्यांदा ट्रॉफी पटकावली. यामुळे टीमचे चाहते आणि मालक निश्चितच आनंदी झाले असणार. एका व्हॉटसअ‍ॅप मेसेजनुसार, आयपीएलमधील विजयाने आनंदविभोर होऊन टीमच्या मालक नीता अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांना एक स्पेशल भेट देण्याचे ठरविले आहे. जिओचे सीमकार्ड वापरणाऱ्या सुमारे 20 हजार भाग्यवान ग्राहकांना 399 रुपयांचे तीन महिन्यांची व्हॅलिडिटी असणारे रिचार्ज मोफत दिले जाणार आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना? खरंच असं असेल का? चला जाणून घेऊ यामागील सत्य.

फॅक्ट क्रेसेंडोच्या एका वाचकाने हा मेसेज पाठवून याची तथ्य पडताळणी करण्याची मागणी केली.

व्हॉटसअ‍ॅप मेसेज असा आहे:

IPL ऑफर IPL 2019 MI मुंबई इंडियन के आईपीएल जितने की खुशी में मुंबई इंडियन की मालकिन नीता अंबानी ने 20 हजार Jio  यूजर को 399 का 3 महीने बाला रिचार्ज फ्री में देने का वादा किया है तो अभी निचे नीले रंग के लिंक पर क्लिक करके अपने नम्बर पर रिचार्ज करे |                                                                                                            ?? http://bit.ly/JIO399FREE                                     

क्रप्या ध्यान दे: ? अगर आपके पास Jio  की सिम नहीं है तो आप अपने किसी दोस्त या किसी घर के किसी भी जिओ सिम को रिचार्ज कर सकते हो।

अशाच प्रकारच्या विविध मेसेजेसमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट देण्यात येतात. या वेबसाईट लिंकवर क्लिक करून 399 रुपयांचे मोफत रिचार्ज मिळवल्या जाऊ शकते, असे सांगण्यात येते. जर जिओचे सीमकार्ड नसेल तर मित्राच्या क्रमांवरदेखील रिचार्ज केले जाऊ शकते, अशीदेखील सूचना करण्यात आली आहे.

फेसबुकवरीदेखील हा संदेश फिरत आहे.

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम रिलायंस जिओ कंपनीने अशी काही ऑफर केली दिली आहे का हे तपासले. जिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अशी कोणतीही फ्री रिचार्जची ऑफर आढळली नाही. जिओच्या स्पेशल ऑफर सेक्शनमध्येसुद्धा ही ऑफर नाही. तसेच कंपनीकडून शेवटची प्रेस रिलीज 17 जानेवारी 2019 रोजी काढण्यात आली होती. अगदी अलिकडचे सांगायचे तर जिओने सध्या प्राईम मेम्बर्स असणाऱ्या सदस्यांना एका वर्षाची मोफत वाढ दिली आहे. परंतु, याचा आणि मुंबई इंडियन्सच्या विजयाचा काही संबंध नाही.

399 रुपयांच्या मोफत रिचार्जची ऑफर न आढळल्याने फॅक्ट क्रेसेंडोने थेट जिओ कंपनीशी संपर्क साधला. त्यांनी व्हॉटसअ‍ॅपवरील मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. “जिओ कंपनीद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व ऑफर्सची माहिती आमच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असते. वेबसाईटला भेट देऊन कोणत्याही ऑफरची शहानिशा करता येते,” असे जिओने ईमेलमध्ये म्हटले.

यावरून हे तर सिद्ध होते की, मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे 399 रुपयांचे फ्री जिओ रिचार्जचा मेसेज खोटा आहे.

मग या मेसेजमध्ये दिलेल्या वेबसाईटचे काय?

वेगवेगळ्या मेसेजमध्ये वेगवेगळ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोकडील मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर – www.apkmaster.xyz – एक वेबसाईट उघडली. खाली होमपेजचा स्क्रीनशॉट पाहू शकता. यामध्ये जिओच्या धन धना धन ऑफरचे पोस्टर दिसते. तसेच आप सभी को मिलेगा 399 रिचार्ज पैक फ्री असे म्हटले आहे. फ्री रिचार्जसाठी नाव आणि जिओ नंबर टाकण्यास सांगितले जाते. त्याप्रमाणे आम्ही ABC हे नाव आणि 8877887788 असो बोगस क्रमांक टाकला.

त्यानंतर दुसरे पेज (https://1august15.blogspot.com/#) उघडले. येथे हिंदित लिहिले की, मुंबई इंडियन के प्रचार के लिए और अपनी फ्री रिचार्ज करने के लिए नीचे हरे रंग के बटन को दबा कर इस ऑफर को दस लोगो या 10 ग्रुप में भेजना होगा ताकि मुंबई इंडियन का विज्ञापन हो सके इसके बाद आप नीले बटन को दबा कर अपनी फ्री रिचार्ज प्राप्त कर सकते हो ||

मुंबई इंडियन्सच्या प्रचारासाठी हा मेसेज 10 जणांना व्हॉटसअ‍ॅप करण्यास सांगण्यात येते. विशेष म्हणजे येथून बॅक येण्याचा प्रयत्न केला असता मजेशीर मेसेज स्क्रीनवर येतो – केवल 10 लोगों को भेजें इस मैं कंजूसी नही.

“शेयर ऑन व्हॉटसअ‍ॅप” नावाच्या हिरव्या बटणावर क्लिक केल्यावर मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन उघडते. विशेष म्हणजे कोणालाही मेसेज न करता. केवळ दहा वेळेस हिरव्या बटणावर क्लिक करून बॅक आल्यावर “रिचार्ज करे” हे निळे बटण अ‍ॅक्टिव्ह होते. त्यावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर एक रेजिस्ट्रेशन नंबर फ्लॅश होतो. हा नंबर एका सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवण्यासही सांगितले जाते. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करण्याची विचारणा केली जाते. त्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. ते अ‍ॅप इन्स्टॉल करून आपल्या मोबाईल नंबरद्वारे अकाउंट तयार करावे लागते. मग 3.5 मिनिट अ‍ॅप वापरून नंबर व्हेरिफायच्या बटणावर क्लिक करण्याची सूचना येथे दिलेली आहे.

अ‍ॅपच्या लिंकवर क्लिक केल्यावर गुगल प्लेस्टोअरवर ड्रीम क्रिकेट – बेस्ट गेम ऑफ 2018 या व्हिडियो गेमचे अ‍ॅप उघडते. व्हर्च्युअल क्रिकेट गेम प्रकारातील हे एक अ‍ॅप आहे. यामध्ये खेळाडू पेटीएम आणि पेपॅल कॅश जिंकू शकतात. याचाच अर्थ की, हा सगळा खटाखटाटोप हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठीचे क्लिकबेट आहे. याचा आणि जिओ रिचार्जचा काही संबंध नाही. यूजरला भूलथापा मारून हे अ‍ॅप डाऊनलोड करायला लावायचे हाच यामागचा हेतू आहे.

निष्कर्ष

नीत अंबानी किंवा रिलायंस जिओ कंपनीने मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकल्यामुळे 20 हजार जिओ युजरना 399 रुपयांचे मोफत रिचार्ज देण्याचा निर्णय घेतलेला नाही. असा मेसेज खोटा आहे.

Avatar

Title:JIO FACT: मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे खरंच जिओ देणार का 399 रुपयांचे फ्री रिचार्ज?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •