Fact Check : नृत्य करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

False राजकीय | Political

नृत्य करणारी एक व्यक्ती भाजपचा नेता असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. भाजपचा एक नेता बँकॉकमध्ये विकास करत आहे… जागा भक्तांनो अशी माहिती Riyaz Shah यांनी एका व्हिडिओसह पोस्ट केली आहे. अशीच माहिती Avinash Yengalwar यांनीही पोस्ट केली आहे. ही व्यक्ती नक्की भाजप नेता आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी

नृत्य करणारी व्यक्ती भाजप नेते आणि नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार सुधांशू त्रिवेदी असल्याचा दावा काही जण करत असल्याने आम्ही त्यांनी स्वत: याबाबत काय ट्विट केले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. त्यांच्या व्हेरिफाईड फेसबुक पेजवरही त्यांनी याबाबत काहीही म्हटलेले नाही. सुधांशू त्रिवेदी यांनी नुकतीच बँकॉकला भेट दिली आहे का, हे सुध्दा शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अशी कोणतीही भेट दिल्याचे वृत्त आम्हाला दिसून आले नाही. आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. काही जणांनी याचा संबंध भ्रष्टाचारविरोधी मलेशियन सल्लागार मंडळाच्या सदस्याशी जोडल्याचे दिसून येते. याबाबतही कोणतीही माहिती आढळून येत नाही. 

Facebook Link Archived Link

या व्हिडिओतील व्यक्ती ही सुधांशू त्रिवेदी नसली तरी ती नेमकी कोण आहे हे स्पष्ट होत नाही. आपण खाली या व्हिडिओतील व्यक्तीची आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांची तुलनाही पाहू शकता. 

आमच्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, अज्ञात व्यक्तीचा हा व्हिडिओ असून भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांचा असल्याचे सांगत चूकीच्या पध्दतीने पसरविण्यात येत आहे. 

निष्कर्ष 

भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाने पसरविण्यात येत असलेल्या या व्हिडिओतील व्यक्ती भाजप नेते असल्याचे सिध्द होत नाही. ही व्यक्ती कोण आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्टमधील दावा असत्य आढळला आहे. 

Avatar

Title:Fact Check : नृत्य करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False