
इंडोनेशियातील शिवमंदिर म्हणून सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
इंडोनेशियातील शिवमंदिर म्हणून सोशल मीडियावर दावा करण्यात येत असलेले हे मंदिर खरोखरच इंडोनेशियातील आहे का? याचे तथ्य शोधण्यासाठी आम्ही हे छायाचित्र गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधले. त्यावेळी ते थायलंडमधील वट अरुण नावाचे मंदिर असल्याचे समोर आले.
विकीपीडियावर असलेल्या माहितीनुसार हे एक बौध्द मंदिर आहे. या मंदिराच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीनुसार हे उगवत्या सुर्याचे मंदिर आहे. मराठी भाषेत याला अरुणोदयाचे मंदिर असेही आपण म्हणू शकतो.
अरुणोदय मंदिराचे संकेतस्थळ/Archive
युटूयूबवरील वेट अरुण मंदिराबाबतचे अनेक व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. बँकॉकमधील या मंदिराचा एक व्हिडिओ आपण खाली पाहू शकता
वेट अरुण मंदिराचे गुगल स्ट्रीट व्ह्यूच्या सहाय्याने दिसणारे दृश्य तुम्ही Google Map एम्बेडच्या सहाय्याने खाली पाहू शकता.
Google Map एम्बेड :
निष्कर्ष
इंडोनेशियातील शिवमंदिर म्हणून व्हायरल होत असलेल्या पोस्टमधील फोटो हा इंडोनेशियातील नाही. व्हायरल होत असलेला हा फोटो थायलंडमधील बँकॉक शहरातील वेट अरुण मंदिराचा आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.
