Coronavirus: चीनने कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्याचे हे रुग्णालय बांधले का?

Coronavirus False आंतरराष्ट्रीय वैद्यकीय

चीनने कोराना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्यांचे रुग्णालय बांधल्याचे दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. या इमारतील पहिला मजला तर फक्त 16 तासांत उभारण्यात आला, असे म्हटले जात आहे. 

या इमारतीत वीज, पाणी या सुविधासह रुग्णालयासाठी लागणारी सर्व उपकरणे आहेत, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीमध्ये हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

एका इमारतीच्या बांधकामाचा व्हिडियो शेयर करून म्हटले की, 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक | Archive

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोविषयी इंटरनेटवर शोधल्यावर कळाले की, हा व्हिडियो पाच वर्षांपूर्वीचा आहे. द गार्डियनने 30 एप्रिल 2015 रोजी हा व्हिडियो अपलोड करून माहिती दिली की,, दक्षिण चीनमधील हुनान प्रांतातील चांगशा येथे 19 दिवसांत हा 57 मजल्याचा टॉवर बांधण्यात आला होता. दररोज तीन मजले या गतीने हे काम 19 दिवसांत पूर्ण करण्यात आले होते.

screenshot-www.theguardian.com-2020.02.01-14_31_03.png

द गार्डियनच्या संकेतस्थळावरील व्हिडिओ / Archive

द वॉल स्ट्रीट जर्नलनेही 13 मार्च 2015 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत युटुयूबवर अपलोड केलेला व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.

Archive

या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ब्रॉड ग्रुपच्या संकेतस्थळावर आपण या इमारतीचे आणखी व्हिडिओ पाहू शकता. यातून हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ जुना म्हणजेच कोरोनाची साथ येण्यापूर्वीचा 2015 मधील आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण हा मध्य चीनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये सापडला आहे. त्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. 

चीनने कोराना व्हायरसच्या रुग्णांसाठी दहा दिवसांत 1000 खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले आहे. सीजीटीएएनच्या बातमीनुसार, 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या इमारतींच्या बांधकामाचे थेट प्रक्षेपण आपण येथे पाहू शकता.

निष्कर्ष

चीन सरकारतर्फे कोरोनो व्हायरसच्या उपचारासाठी उभारत असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचा हा व्हिडिओ नाही. 2015 मध्ये दक्षिण चीनमध्ये उभारण्यात आलेल्या एका इमारतीचा हा जूना व्हिडिओ आहे.

Avatar

Title:Coronavirus: चीनने कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी 19 दिवसांत 57 मजल्याचे हे रुग्णालय बांधले का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False