
मोदी सरकार हे आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र सरकार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. फोर्ब्स मासिक आणि ट्रान्सपरसी इंटरनॅशनलने असे म्हटल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
मोदी सरकार हे आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र सरकार आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम फोर्ब्स मासिकाच्या संकेतस्थळावर गेलो. व्हायरल होत असलेल्या पोस्टमधील मुळ माहिती 2017 मधील असल्याने आम्ही त्यावेळचे याबाबतचे वृत्त शोधले. फोर्ब्सने 13 मार्च 2017 रोजी आशियाई देशातील भ्रष्ट्राचाराबद्दल वृत्त प्रसिध्द केले आहे.

फोर्ब्सने भारतातील भ्रष्ट्राचाराविषयी काय म्हटले आहे. हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात भारतातील शाळा, रुग्णालये. ओळखीची कागदपत्रे, पोलीस आणि अन्य सेवांसाठी निम्म्या भारतीयांना भ्रष्ट्र मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याचे म्हटले आहे. यात कुठेही मोदी सरकार आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र सरकार असल्याचे म्हटलेले नाही.

फोर्ब्सच्या ट्विटर हॅन्डलवरही याबाबतचे वृत्त आढळून येते.
Asia's most corrupt countries:
— Forbes (@Forbes) September 1, 2017
1. India
2. Vietnam
3. Thailandhttps://t.co/7AoKtLHE79 pic.twitter.com/vKTSKofZe3
त्यानंतर प्रभात खबर या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने 8 जून 2017 रोजी दिलेल्या एका वृत्तात फोर्ब्सने ट्रान्सपरसी इंटरनॅशनलचा एक अहवाल छापल्याचे म्हटले आहे. यात भारत हा आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र देश असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारचे प्रयत्न प्रशंसा करण्यायोग्य पण अपुरे असा या बातमीचा मथळा आहे.

गाव कनेक्शन या संकेतस्थळानेही 1 सप्टेंबर 2017 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तातही भारत आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र देश असल्याचे म्हटले आहे. पण या वृत्तातही कुठेही मोदी सरकार हे आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र सरकार असल्याचे म्हटलेले नाही.

www.transparency.org या संकेतस्थळावर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध आहे.
निष्कर्ष
मोदी सरकार हे आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र सरकार असल्याची फोर्ब्स मासिक आणि ट्रान्सपरसी इंटरनॅशनलच्या नावाने पसरत असलेली पोस्ट खोटी असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत आढळून आले आहे.

Title:सत्य पडताळणी : मोदी सरकार आशियातील सर्वाधिक भ्रष्ट्र सरकार?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
