जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ किड्याचे इन्फेक्शन होत नाही; वाचा सत्य
मुले मोबाईलवर गेम खेळण्यावरून पालकांची नेहमीच कुरबुर सुरु असते. ‘मोबाईल/टीव्हीमुळे डोळे खराब होतील’ हे नेहमीच सांगितले जाते. परंतु, आता सोशल मीडियावर त्यापुढे जाऊन दावा केला जात आहे की, जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ किड्याचे इन्फेक्शन (संसर्ग) होते. त्यासोबतच डोळ्यातून एक लांब किडा/अळी काढतानाचा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, या व्हिडिओसोबत केला जाणारा दावा खोटा आहे. मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात कोणत्याही किड्याचे इन्फेक्शन होत नाही.
काय आहे दावा?
सोशल मीडियावरील सर्जरीच्या व्हिडिओमध्ये डोळ्यातून एक लांब किडी/अळी बाहेर काढली जाते. दावा केला जात आहे, जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ नावाचा किडा विकसित होतो. तो ऑपरेशनद्वारे बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ आहे.
सूचनाः व्हिडिओतील दृश्ये विचलित करु शकतात.
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका काय आहे याचा शोध घेतला. कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यावर इंटरनेटवर एका डॉक्टरने 8 वर्षांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.
‘इंडिया व्हिडिओ’ नामक वेबसाईटच्या युट्यूबचॅनेलवर डोळ्यातून किडी/अळी बाहेर काढतानाच्या ऑपरेशनचा हा व्हिडिओ आहे. डॉ. अॅशले जेकब नामक डॉक्टरने 2013 साली हे ऑपरेशन केले होते. एका रुग्णाच्या डोळ्यातून 20 सेमी लांब अळी बाहेर काढण्यात आली होती.
‘इंडिया व्हिडिओ’ वेबसाईटवर या व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, या अळीचे नाव ‘लोआ लोआ’ आहे. ही अळी मुख्यतः पश्मिम आफ्रिकेत आढळते.
मँग्रुव्ह किंवा डिअर माशीद्वारे या अळीचा प्रसार होतो. ही माशी मानवी त्वचेला कापून रक्ते चाटते. असे करत असताना लोआ लोआ नावाची ही अळी आपल्या शरीरात प्रवेश करते.
काय आहे लोआ लोआ अळी?
लोआ लोआ ही परजीवी (Parasite) अळी आहे. पश्चिम व मध्य आफ्रिकतील वनांमध्ये आढळणाऱ्या माशीवर ती जगते. डोळे, हृदय, फुफ्फुस किंवा त्वचे खाली या अळीचा संसर्ग होऊन सूज येते. अमेरिकेतील सीडीसीनुसार, आफ्रिकेमध्ये सुमारे तीन कोटी लोकांना या अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे.
फॅक्ट क्रेसेंडो व्हिडिओतील ऑपेरशन करणारे डॉ. अॅशले जेकब यांच्याशी संपर्क साधला. केरळमधील मुलामुथिल आय हॉस्पिटलचे ते संस्थापक संचालक आहेत.
व्हिडिओबाबत केला जाणारा व्हायरल दावा खोडून काढत त्यांनी ईमेलद्वारे उत्तर दिले की, “सदरील व्हिडिओ मी केलेल्या सर्जरीचा आहे. कोणीतरी खोडसाळपणे याव्हिडिओविषयी खोटी माहिती पसरवित आहे. आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्यावर 2013 मी हे ऑपरेशन केले होते. जखमेतून अथवा दुषित अन्नापासून लोआ लोआ नामक परजीवाचा संसर्ग होतो. त्या रुग्णाला हा संसर्ग मोबाईल गेम खेळल्यामुळे झाला नव्हता.”
मोबाईलमुळे खरंच असा संसर्ग होऊ शकतो का, या प्रश्नावर डॉ. अॅशले म्हणाले की, ही निव्वळ अफवा आहे. मोबाईल गेम खेळल्याने असे काही होत नाही. मोबाईल स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्याने डोळ्याची जळजळ किंवा इतर परिणाम होऊ शकतात परंतु, त्यामुळे परजीवी किंवा पॅराईसाईटचा संसर्ग होतो हे विधान अवैज्ञानिक आहे.
डॉ. अॅशले यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरदेखील 2013 साली हा व्हिडिओ शेअर केला होता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, लोआ लोआ अळीळ्या संसर्गामुळे डोळ्याचे ऑपरेशन करतानाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे. मोबाईलवर जास्त वेळ गेम खेळल्याने पॅराईटचा संसर्ग होत नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याने डोळ्यात ‘पॅरासाईट’ किड्याचे इन्फेक्शन होत नाही; वाचा सत्य
Fact Check By: Agastya Deokar
Result: False