
इंदिरा गांधी यांनी बंकरमध्ये जाऊन जवानांना शुभेच्छा दिल्याचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर पसरत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये इंदिरा गांधी आणि एक सुरक्षारक्षक गुहेतून वाकून जाताना दिसतात. फेसबुकवर हा फोटो शेयर करून म्हटले आहे की, ‘इंदिरा गांधी बंकरमध्ये जाऊन जवानांना शुभेच्छा देत; पण त्यांनी त्याचे कधीच भांडवल केले नाही’. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
मूळ फोटो येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
सदरील फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले असता इंडिया हिस्ट्री पिक या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेयर केल्याचे आढळले. या ट्विटमध्ये म्हटले की, माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. आपण हे ट्विट खाली पाहू शकता.
न्यूजट्रॅक, साक्षी, द एशियन क्रॉनिकल या संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसारही हा फोटो इंदिरा गांधी या मंदिरात दर्शनास जात असताना घेण्यात आला होता. जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या अधिकृ फेसबुक पेजवरसुद्धा या फोटोसोबत हीच माहिती देण्यात आली की, माता वैष्णोदेवीचे दर्शन करुन इंदिरा गांधी गुफेतून बाहेर पडताना हा फोटो घेण्यात आला होता.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, इंदिरा गांधी यांनी बंकरमध्ये जाऊन जवानांना शुभेच्छा देतानाचा हा फोटो नाही. माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन त्या गुफेतून बाहेर पडतानाचा हा फोटो आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:इंदिरा गांधी यांनी बंकरमध्ये जवानांना शुभेच्छा देतानाचा म्हणून वैष्णोदेवी भेटीचा फोटो व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
