
फिरून केळी विकणाऱ्याची फळे पोलीस जप्त करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. फळे जप्त करणारे हे महाराष्ट्र पोलीस असल्याचा दावाही काही जण करत आहेत. फळे जप्त करणारे हे खरोखर महाराष्ट्र पोलीस आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
फिरून केळी विकणाऱ्याची फळे पोलीस जप्त करत असल्याचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे का, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक द्दश्य घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी हिंदी वनइंडिया या संकेतस्थळावरील 27 जुलै 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात या व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, ओडिशातील ब्रह्मपुरी येथील हा व्हिडिओ आहे.
त्यानंतर शुभम शेखर साहू या युवकाने त्याच्या ट्विटर 13 जुलै 2020 रोजी हा व्हिडिओ ट्विट केला असल्याचे दिसून आले. त्याला उत्तर देताना ओडिशा पोलिसांनी याबद्दल खेद व्यक्त केला. याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या विक्रेत्याचे झालेले नुकसान भरून देण्यासही सांगण्यात आल्याचे पोलिसांनी या उत्तरात स्पष्ट केले आहे.
यातुन हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नसून ही घटना महाराष्ट्रात घडलेली नाही. ओडिशातील ब्रम्हपुरी येथे लॉकडाऊन दरम्यान घडलेली ही घटना आहे.
निष्कर्ष
फिरत्या केळी विक्रेत्याची फळे जप्त करण्यात आल्याचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित असल्याचा दावा असत्य आढळला आहे.

Title:फिरून केळी विकणाऱ्याची फळे जप्त केल्याचा ओडिशातील व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
