तीन वर्ष ट्विंकलच्या मृत्यूचे कारण “बलात्कार” आहे आहे का?

False सामाजिक

गुन्हेगारी प्रवृत्ती समाजाला नेहमीच घातक असते. सोशल मीडियावर सध्या एका तीन वर्षीय मुलीच्या मृत्यूच्या कारणाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील अलीग़ड येथील एका बालिकेवर दोन मुस्लीम व्यक्तींनी बलात्कार केल्याने तिचा मृत्यू झाला असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील अडिच ते तीन वर्षाती लहान मुलगी ट्विंकल हिच्या मृत्यूचे कारण बलात्कार म्हटले असून, तिच्यावर दोन मुस्लीम व्यक्तींनी बलात्कार केला असे पोस्टमध्ये लिहिले आहे. पोस्टमध्ये त्यामुलीचा फोटो आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तींचा फोटो आणि माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशातील अलीग़ड येथील ट्विंकल नावाच्या छोट्या बालिकेच्या मृत्यूबद्दलच्या पोस्टविषयी सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर अलीग़ड ट्विंकल मर्डर केस असे सर्च केले. सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये ट्विंकल या तीन वर्षीय मुलीचे मृत्यूचे कारण तिच्यावर दोन मुस्लीम व्यक्तींनी बलात्कार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असे म्हटले आहे. परंतू प्रसारमाध्यमांमध्ये उत्तर प्रदेशातील ट्विंकल हिच्या मृत्यूचे कारण पोलिसांच्या तपासानंतर वेगळे आढळून आले आहे.

काय आहे ट्विंकलच्या मृत्यूचे खरे कारण

ही घटना आहे उत्तर प्रदेशातील अडिच वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची नोंद अलीग़ड पोलिस स्टेशनमध्ये  07 जून 2019 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अडिच वर्षाच्या ट्विंकलचा मृतदेह अलीग़ड येथील अज्ञात स्थळी सापडला. त्यानंतर 07 जून 2019 आणि 08 जून 2019 रोजी विविध वृत्तपत्रामध्ये यासंबंधी बातम्या आलेल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ट्विंकलच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर ट्विंकलचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला आहे असे समोर आले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.

The telegraph l अर्काईव्ह

लाईव्ह हिंदूस्तानअर्काईव्ह

नवभारत टाईम्सअर्काईव्ह

या संपुर्ण मर्डर प्रकरणाबाबतीत अलीग़ड पोलिस स्टेशनने ट्विटरवर ट्विट करुन त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये दोन्हीही मुस्लीम व्यक्ती आरोपींना अटक करण्यात आली असून, ट्विंकलच्या मृत्यूचे कारण हे बलात्कार नसून गळा आवळल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

त्याचप्रमाणे अलीग़ड पोलिस स्टेशनचे पोलिस अधिक्षक अक्षय खुल्हारे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया युट्युबवर डीकेओडिंग या चॅनलवर 07 जून 2019 रोजी अपलोड करण्यात आलेली आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील अलीग़ड येथील ट्विंकल या बालिकेच्या मृत्यूचे कारण तिच्यावर दोन मुस्लीम व्यक्तीनी बलात्कार केल्यामुळे झाला असा दावा करण्यात आलेला आहे. परंतू अलीग़ड पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ट्विंकलचा मृत्यू बलात्कारामुळे नाही तर, गळा आवळून झाला आहे. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला ट्विंकलच्या मृत्यूचे कारण बलात्कार हे असत्य आहे.

Avatar

Title:तीन वर्ष ट्विंकलच्या मृत्यूचे कारण “बलात्कार” आहे आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False