
कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण जग झुंजत आहे. कोविड-19 महारोगावर अद्याप खात्रीशीर इलाज नसला तरी भारतातर्फे अनेक देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (HCQ) या गोळ्यांचा पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही विदेशी तरुण भारतीय राष्ट्रगीत गातानाचा व्हिडियो शेयर केला जात आहे. सोबत म्हटले की, भारताने जगभरात औषधांचा पुरवठा केल्यामुळे भारताला धन्यवाद देण्यासाठी त्यांनी हा व्हिडियो तयार केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.
काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
की-वर्ड्सच्या माध्यमातून सर्च केल्यावर आढळले की, हा व्हिडियो सुमारे अडीच वर्षांपूर्वीचा आहे. अनिशा दीक्षित या युट्यूब क्रीएटरने हा व्हिडियो तयार केला होता. यामध्ये अमेरिकेतील तरुण भारताचे राष्ट्रगीत गाताना दिसतात. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.
व्हिडियोसोबतच्या महितीनुसार, 12 ऑगस्ट 2017 रोजी हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता. भारताच्या 71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनिशाने या व्हिडियोची निर्मिती केली होती. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जागतिक स्वातंत्र्य आणि विविधतेला सलाम करण्यासाठी हा व्हिडियो तयार केल्याचे अनिशाने म्हटले आहे.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेतील तरुण भारतीय राष्ट्रगीत गातानाच्या या व्हिडियोचा सध्याच्या कोविड-19 महामारीशी काही संबंध नाही. हा 2017 सालातील व्हिडियो आहे. भारताने जगाला औषधगोळ्या दिल्या म्हणून विदेशी तरुणांनी आपले राष्ट्रगीत गायिले नव्हते.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:औषधांची मदत केल्यामुळे या विदेशी मुलांनी भारताचे राष्ट्रगीत गायिले नाही. वाचा त्यामागील सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
