इराणच्या कासिम सुलेमानी यांना ठार मारतानाचे दृश्य म्हणून मोबाईल गेमचा व्हिडियो व्हायरल

False आंतरराष्ट्रीय

इराणी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ल्यात ठार केले आहे. जनरल सुलेमानी यांना ठार करतानाचा व्हिडियो म्हणून समाजमाध्यमात एक क्लिप सध्या पसरत आहे. वसई नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

Archive

तथ्य पडताळणी    

व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडूण गुगल रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात हेच छायाचित्र आम्हाला वाईस या संकेतस्थळावर 15 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झाले असल्याचे दिसून आले. या संकेतस्थळावर असलेल्या वृत्तानुसार हे एका व्हिडिओ गेममधील द्दश्य आहे. अमेरिका आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनांमधील संबंध दर्शविण्यासाठी रशियाने ते वापरले होते. 

vice.com-2020.01.07-10_10_24.png

Vice / Archive 

रशियाने याबाबत आपली चूक मान्य करणारे प्रसिद्धीपत्रक (संग्रहित) जारी केले होते. याबाबतची समाजमाध्यमात असलेली माहितीही काढून टाकली. ती संग्रहित माहिती मात्र अजुनही उपलब्ध आहे. 

या व्हिडिओ गेमचे नाव AC-130 Gunship Simulator आहे. बाईट कन्वेयर स्टुडिओज कंपनीतर्फे हा गेम तयार करण्यात आला आहे. कंपनीतर्फे 25 मार्च 2015 रोजी या गेममधील एक प्रीव्ह्युव  युटूयबवर अपलोड करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. 

Archive

रशियाने अमेरिकेविरोधात हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबतचे एक ट्विटही आपण खाली पाहू शकता. 

Archive

याव्यतिरिक्त bellingcat.com या संकेतस्थळानेही याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

निष्कर्ष 

इराणी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केल्याचा हा व्हिडिओ नाही. एका मोबाईल गेमची ही क्लिप आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:इराणच्या कासिम सुलेमानी यांना ठार मारतानाचे दृश्य म्हणून मोबाईल गेमचा व्हिडियो व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False