Fact Check : हा फोटो नागपूर मेट्रोचा आहे का?

False राजकीय
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

सिंगापूर किंवा जपान नाई बे, नागपूर आहे. अन हे गेल्या तीन वर्षात झालं आहे. पुणे मेट्रोचं काय झालं #बेंबट्या? अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या फोटोची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

सिंगापूर किंवा जपान नव्हे तर हे नागपूर आहे असा दावा करण्यात आल्याने आम्ही सर्वप्रथम नागपूर मेट्रोच्या संकेतस्थळास भेट दिली. त्यावेळी आम्हाला नागपूर मेट्रोसंदर्भात माहिती आणि छायाचित्रे या संकेतस्थळावर दिसून आली. याठिकाणी विविध मराठी, हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांनी नागपूर मेट्रोबाबत प्रसिध्द केलेल्या बातम्याही आम्हाला दिसून आल्या. यातील एकाही वर्तमानपत्रात नागपूर मेट्रोचे हे छायाचित्र आम्हाला दिसून आले नाही.

Archive

हा फोटो नागपूर मेट्रोचा नाही तर मग कुठला आहे, असा प्रश्न त्यामुळे आम्हाला पडला. त्यानंतर गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्ही या फोटोचा शोध घेतला. तेव्हा हा फोटो जयपूर येथील असल्याचे आमच्या पडताळणीत दिसून आले.

Archive

जयपूर मेट्रोच्या संकेतस्थळास त्यानंतर आम्ही भेट दिली. त्याठिकाणी आम्हाला विविध छायाचित्रे आणि व्हिडिओ दिसून आले. विकीपीडियावर असलेल्या जयपूर मेट्रोच्या माहितीत आम्हाला थेट हे छायाचित्र दिसून आले.

Archive

निष्कर्ष

नागपूर मेट्रोचे म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र जयपूर मेट्रोचे आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे आढळले आहे.

Avatar

Title:Fact Check : हा फोटो नागपूर मेट्रोचा आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •