‘आप’चे नेते गोपाल ईटालिया यांचा जेलमधील जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविरोधात अपशब्द वापरल्यामुळे आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया सध्या चर्चेत आले आहेत. नुकतेच दिल्लीत महिला आयोगाच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. 

यानंतर त्यांच्या जेलमधील एक फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, दिल्ली पोलिसांनी इटालिया यांना अटक केल्यानंतरचा हा फोटो आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून याची सत्यता विचारली.

आमच्या पडताळणीत हा फोटो जुना आढळला.  

काय आहे दावा ?

गोपाल इटालिया जेलमध्ये असतानाचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, “गुजरातमध्ये भाजप इतकी रसातळाला गेला आहे की, ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आले.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी 

गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे कळाले की, हा फोटो पाच महिन्यांपूर्वीचा आहे. व्हाईब्स ऑफ इंडिया वेबसाईटवर गोपाल इटालिया यांचा जेलमधील फोटो 2 मे 2022 रोजी अपलोड करण्यात आल्याचे आढळले. 

अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, मे महिन्यात सुरत महानगरपालिकेमध्ये ‘आप’चे नगरसेवक व कर्याकर्त्यांना पोलिस व अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. याविरोधात आप आदमी पक्षातर्फे सुरतमध्ये भाजप कार्यलायासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळीसुद्धा भाजप आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली. 

सुरत पोलिसांनी गोपाल इटालिया यांच्यासह ‘आप’च्या 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. इटालिया यांचा सदरील फोटो त्यावेळी काढण्यात आला होता.  

दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी इटलिया व सहकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत भाजपवर गुंडागर्दीचा आरोप केला होता. 

https:/twitter.com/ArvindKejriwal/status/1521074423901564928

इटालिया यांना दिल्ली अटक करण्यात आली का?

नरेंद्र मोदी व त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाना इटालिया यांच्याविरोधात तक्रार नोंदविलेली आहे. त्यानिमित्त इटालिया यांना 13 ऑक्टोबर रोजी आयोगाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. 

यावेळी आयोगाच्याबाहेर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रदर्शने केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी इटालिया यांना ताब्यात घेतले. मात्र, तीन तासांनंतर त्यांना सोडण्यात आले. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला फोटो पाच महिने जुना आणि सुरतचा आहे. गोपाल इटालिया यांना नुकतेच दिल्ली पोलिसांनी काही तासांसाठी ताब्यात घेतल होते; मात्र लगेच सोडलेदेखील होते. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title: ‘आप’चे नेते गोपाल ईटालिया यांचा जेलमधील जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Factcrescendo Team 

Result: Misleading