वुहानमधील नागरिक जीव वाचविण्यासाठी आकांत करत असल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

Coronavirus False Medical

कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतातही कोरोना व्हायरसबद्दल सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत इमारतींमधील नागरिक आरडाओरडा करत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. “जीवाची भीक मागताना वुहानमधील लोक आपल्या घरातून ओरडत आहेत. मदत आणि उपचाराऐवजी त्यांना घरात डांबून ठेवण्यात आले आहे. चीनमधील लोकांचा हा आकांत शतकानुशतके जागतिक समुदायाचा पाठलाग करेल. कोरोना व्हायरस आता चरमसीमेवर पोहचत आहे. भारताला तात्काळ तयारीला लागले पाहिजे” असा दावा करत मरियम खान यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ खरोखरच जीव वाचविण्यासाठी आकांत करणाऱ्या नागरिकांचा आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

चीनमधील वुहान शहरात खरोखरच अशी घटना घडली का, याचा आम्ही शोध घेतला. यावेळी मिळालेल्या परिणामात आम्हाला पत्रकार ब्रिजेश मिश्रा यांचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये याच दाव्यासह हा व्हिडिओ दिसून आला. 

Archive

या ट्विटला उत्तर देताना अनेकांनी हा व्हिडिओ कोरोना व्हायरस जगासमोर आणणाऱ्या डॉ. ली वेनलियांग यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली असल्याचे म्हटले आहे. 

Archive

हा व्हिडिओ नीट ऐकल्यावर आम्हाला वुआन अॅड ऑईल असे शब्द ऐकू आले. हा शब्दप्रयोग करत शोध घेतल्यावर आम्हाला युटूयूबवर अनेक व्हिडिओ दिसून आले. यातील साईथ चायना मॉर्निग पोस्टचा 28 जानेवारी 2020 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ हा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी मिळताजुळता असल्याचे दिसून आले. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत, वुहान शहर हे 23 जानेवारीपासून कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी बंद असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी मात्र धैर्य वाढविण्यासाठी त्यांचा मार्ग शोधून काढला. ते आपल्या घरातून ओरडत आहेत आणि देशभक्तीपर गाणी म्हणत आहेत. हा व्हिडिओ चिनी समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. असे म्हटले आहे.

Archive

काही चिनी भाषेत माहिती असणारे व्हिडिओही आम्हाला दिसून आले. यातील Epoch times चा 7 फेब्रवारी 2020 चा व्हिडिओ तोच व्हिडिओ असल्याचे दिसून आले. त्याखाली दिलेल्या माहितीचे भाषांतर केले असता हा व्हिडिओ डॉ. ली वेनलियांग यांना श्रध्दांजली वाहतानाचा असल्याचे स्पष्ट होते. रात्री 8:55 ते 9:05 या कालावधीत वुहानमध्ये डॉ. ली वेनलियांग यांना श्रध्दांजली वाहण्यात आल्याचे यात म्हटले आहे.

Archive 

निष्कर्ष 

वुहानमधील नागरिक जीव वाचविण्यासाठी आकांत करत असल्याचा हा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ कोरोना व्हायरस जगासमोर आणणाऱ्या डॉ. ली वेनलियांग यांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहतानाचा आहे.

Avatar

Title:वुहानमधील नागरिक जीव वाचविण्यासाठी आकांत करत असल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False