गोमुत्राच्या अतिसेवनामुळे प्रज्ञा ठाकूर यांना दवाखान्यात न्यावे लागले का? वाचा सत्य

False राजकीय

दररोज गोमुत्र पिल्यामुळे मला कोरोना झाला नाही, असे विवादस्पद विधान करणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

स्ट्रेचर झोपलेल्या प्रज्ञा ठाकूर यांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात भरती करतानाचा हा फोटो आहे. दावा केला जात आहे की, गोमुत्राचे अतिसेवन केल्यामुळे त्यांना मुंबईच्या दवाखान्यात भरती करावे लागले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो 2013 मधील असून, जुना फोटो आताचा म्हणून शेअर केला जात आहे.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो सुमारे 8 वर्षांपूर्वीचा आहे. 

‘द हिंदु’ वेबसाईटवरील बातमीनुसार हा फोटो 9 जानेवारी 2013 रोजीचा आहे. प्रज्ञा ठाकूर यांना कर्करोग झाल्यानंतर त्यांना भोपाळच्या जवाहरलाल नेहरू कॅन्सर हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीकरीता घेऊन जातानाचा हा फोटो आहे.

प्रज्ञा ठाकूर 2013 साली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भोपाळच्या कारागृहात होत्या. त्यावेळी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते.


READ: भाजप आणि मोदींवर खरमरीत टीका करणारी ही महिला मनेका गांधी नाही


‘द हिंदु’ बातमीचा स्क्रीनशॉट. फॅक्ट क्रेसेंडोतर्फे बदल करण्यात आले आहेत. 

त्यांच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी स्वतः ट्विटरद्वारे त्यांचे खंडन केले. 

लोकसभेतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करून त्यांनी सांगितले की, मी आजारी नसून, भोपाळमध्ये कोरोना पीडितांची मदत करीत आहे. माझ्या तब्येतीविषयी खोटी पसरविली जात आहे.

अर्काइव्ह


READ: ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हटल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्याला मारले का?


निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, प्रज्ञा ठाकूर यांचा 8 वर्षे जुना फोटो आताचा म्हणून असत्य दाव्यासह शेअर केला जात आहे. गोमुत्राच्या अतिसेवनामुळे त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलेले नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गोमुत्राच्या अतिसेवनामुळे प्रज्ञा ठाकूर यांना दवाखान्यात न्यावे लागले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False