कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी समाजमाध्यमात सध्या वेगवेगळे संदेश पसरत आहेत. कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होतो आणि यामुळे तुमचा बचाव होतो. कोरोना विषाणूवर भिमसेनी कापूर हा उपाय आहे, अशा स्वरुपाचे हे संदेश आहेत. बाळा अमृते यांनीही अशी माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने खरोखरच कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का याची तथ्य पडताळणी केली आहे.

kaapoor Claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

का हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. त्यावेळी अशा प्रकारची कोणतीही माहिती आम्हाला आढळून आली नाही. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळासही आम्ही भेट दिली. याठिकाणी कोरोनापासून कसा बचाव करावा याची माहिती देण्यात आली आहे. कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होत असल्याची कोणतीही माहिती याठिकाणी आम्हाला दिसून आली नाही. त्यानंतर कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होतो आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळास भेट दिली. त्याठिकाणी आम्हाला कोरोना विषाणू नष्ट करणारे असा कोणताही उपाय सुचविण्यात आल्याचे दिसून आले नाही.

image2.png

यातून हे स्पष्ट होत आहे की, कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होतो याचा  कोणताही ठोस, स्पष्ट अथवा थेट पुरावा आढळत नाही.

निष्कर्ष

कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होत असल्याला जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिलेला नाही. विषाणू नष्ट होत असल्याचा कोणाताही ठोस पुरावा आढळत नाही. त्यामुळे ही बाब असत्य आहे.

Avatar

Title:कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply