Fact Check : मोदींचा शपथग्रहण समारंभ ओबामा पाहत होते का?

False राजकीय
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण समारंभ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पाहत असल्याचे हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या छायाचित्राची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण समारंभ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पाहत असतानाचे छायाचित्र शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला अशाच पध्दतीची अनेक छायाचित्रे दिसून आली.

अक्राईव्ह

हे छायाचित्र कधीचे आहे हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी हे छायाचित्र 2015 चे असल्याचे लक्षात येते. विनोदनिर्मितीसाठी (Memes) या छायाचित्राचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येते.

अक्राईव्ह

हा फोटो अन्य पध्दतीनेही पसरविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण समारंभ पाहताना ओबामा म्हणून पसरविण्यात येणाऱ्या फोटोची दुसऱ्या एका फोटोसोबत करण्यात आलेली तुलना खाली पाहू शकता.

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथग्रहण समारंभ पाहताना ओबामा म्हणून पसरविण्यात येत असलेले मुळ छायाचित्र हे जुने आहे. जुन्या छायाचित्रात बदल करुन ते आता पसरविण्यात येत आहे. त्याचा अनेकदा विनोदनिर्मितीसाठीही वापर करण्यात आल्याचे दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.  

Avatar

Title:Fact Check : मोदींचा शपथग्रहण समारंभ ओबामा पाहत होते का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •