पुन्हा विमान उडविण्यासाठी अभिनंदन यांना लागतील तीन महिने : सत्य पडताळणी

False Headline राष्ट्रीय

पाकिस्तानमधून परत आल्यानंतर सोशल मीडियावर सध्या विंग कमांडर अभिनंदन हे परत विमान उडवू शकतात का? या बद्दल पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पुन्हा विमान उडविण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांना तीन महिने लागतील असे म्हटले आहे.

फेसबुक l

अर्काईव्ह

या पोस्टला पडताळणी करेपर्यँत 2 हजार 500 लाईक्स मिळाले असून, 69 शेअर मिळाले आहेत. ही पोस्ट फेसबुकवर मराठा इम्पायर आणि इतर अनेक पेजवर शेअर झाली आहे.

सत्य पडताळणी

पाकिस्तानमधून परत आल्यानंतर आता विंग कमांडर अभिनंदन परत विमान कधी उडविणार या बद्दलची उत्सुकता ताणली गेली असून, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियातही या विषयावर बातमी प्रसिद्ध झाली आहे.

सौजन्य –  इंडिया टुडे l अर्काईव्ह

सौजन्य – The News Minute l  अर्काईव्ह

खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

इंडिया टुडे l अर्काईव्ह

The News Minute l  अर्काईव्ह

याशिवाय इन्फोबझ्झ या वेब पेजवर या बद्दल लिहिले आहे. पाकिस्तानमधून परत आल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन आता पुन्हा कधी विमान चालविणार? या विषयी वर दिलेल्या इन्फोबझ्झ या वेब पेजवर तीन महिन्यानंतर अभिनंदन विमान चालविणार असे म्हटले आहे.

अर्काईव्ह  

याबद्दल 4 मार्च 2019 ला झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये एअर चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धान्वा यांनी पाकिस्तानमधून परत आल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन आता पुन्हा कधी विमान चालविणार या प्रश्नाला उत्तर दिले आहे. खाली दिलेल्या ओटीव्ही युट्युब चॅनलवर 9.39 मिनिटापासून ते 10.58 मिनिटामध्ये सविस्तर उत्तर दिले आहे.

अर्काईव्ह

एअर चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धान्वा यांनी दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्टपणे असे म्हटले आहे की, विंग कमांडर अभिनंदन यांच्या सर्व वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच, योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

सौजन्य – इंडिया टुडे

परंतू अभिनंदन आता पुन्हा कधी विमान चालविणार? या विषयावर The News Minute वृत्तपत्रातील या लेखात लेखकाने अभिनंदन यांच्यासाठी पुन्हा विमान चालवण्यासाठीची प्रक्रिया फार सोपी अशी नाहीये, असे मत नोंदवले आहे. अभिनंदन यांना विविध वैद्यकीय चाचणी, मानसिक चाचणी आणि कसून चौकशीनंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जे निष्कर्ष येतील त्या नंतरच पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील.

सर्व गोष्टींची तथ्यता तपासल्यानंतर असे आढळून आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पुन्हा विमान उडविण्यासाठी अभिनंदन यांना लागतील तीन महिने, या विषयी एअर चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धान्वा यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरामध्ये, सर्व वैदयकीय चाचणी झाल्यानंतरही, तीन महिने कालावधीबद्दलची स्पष्टता दिलेली नाहीये. परंतू व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये अभिनंदन यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील असे शीर्षक सांगण्यात आले आहे.

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन हे पुन्हा तीन महिन्यानंतर विमान उडविणार या पोस्टमधील शीर्षक चुकीचे आहे.

Avatar

Title:पुन्हा विमान उडविण्यासाठी अभिनंदन यांना लागतील तीन महिने : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False Headline