बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ औषधावर बंदी घालणाऱ्या डॉक्टरला काढण्यात आले का? वाचा सत्य

Coronavirus False
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

योगगुरू बाबा रामदेव यांनी सात दिवसांत पूर्णपणे कोरोना बरा करणारे आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. पंतजलीतर्फे निर्मित या औषधाचे नाव ‘कोरोनिल’ ठेवण्यात आले. परंतु, आयुष मंत्रालयाने या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, तपासणी होईपर्यंत या औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश जारी केले आहेत.

अशातच सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की, बाबा रामदेवच्या ‘कोरोनील’ औषधावर बंदी घालणारा डॉक्टर मुजाहिद हुसेनला आयुष मंत्रालयाने नोकरीवरून काढले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

corosla.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

आयुष मंत्रालयाने खरंच डॉक्टर मुजाहिद हुसेन नावाच्या व्यक्तीला नोकरीवरून काढले का याचा इंटरनेटवर शोध घेतला. परंतु, तशी कोणतीही बातमी आढळून आली नाही. आयुष मंत्रलयाच्या वेबसाईटला भेट दिली असता तेथेदेखील काहीच सापडले नाही.

सदरील केसचे बातमीमूल्य लक्षात घेता आयुष मंत्रालयाच्या या निर्णयाची मोठी बातमी झाली असती. पण तसे काहीच समोर आले नाही.

सोशल मीडियावर सदरील मेसेज व्हायरल होऊ लागल्यानंतर आयुष मंत्रालयाने ट्विटर याबाबत खुलासा केला. व्हायरल मेसेजचा स्क्रीनशॉट शेयर करीत आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले की, आयुष मंत्रालयाने कोणत्याही डॉक्टर वा वैद्यकीय अधिकाऱ्याला नोकरी वा सेवेवरून काढलेले नाही.  

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, आयुष मंत्रालयाने कोणत्याही डॉक्टरला काढलेले नाही. तो व्हायरल मेसेज खोटा आहे.

Avatar

Title:बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ औषधावर बंदी घालणाऱ्या डॉक्टरला काढण्यात आले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply