खलिस्तान समर्थकांचा 2019 मधील व्हिडिओ आताचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

केंद्र सरकारने शेती विषयक नवा कायदा पारित केल्यानंतर त्याविरोधात अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये खलिस्तान समर्थक सहभागी असल्याचे दावा करीत अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत.

असाच एक व्हिडिओ ज्यामध्ये शीख समुदायातील काही लोक पाकिस्तान व खलिस्तान समर्थनात नारे देताना दिसतात. सोबत म्हटले की, जे शेतकरी आंदोलन करीत आहेत, तेच दुसरीकडे भारताविरोधात नारे देत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य सिद्ध झाला. 

काय आहे दावा 

व्हिडिओमध्ये काही शीख लोक ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान, पंजाब बनेगा खलिस्तान, इम्रान खान जिंदाबाद’ असे नारे लावत आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुकआर्काइव 

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम सोशल मीडियावरील व्हिडियोला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केले. त्याद्वारे फेसबुकवर शेयर केलेली एक पोस्ट आढळली. ही पोस्ट 7 नोव्हेंबर 2019 रोजी शेयर केरण्यात आली होती. म्हणजे हा व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या खूप आधीचा आहे. 

अधिक सर्च केल्यावर युट्यूबवरील एक व्हिडियो आढळला. हा व्हिडियो 19 ऑक्टोबर 2019 रोजी शेयर केला गेला होता. सोबत दिलेल्या माहिती नुसार, इम्रान खान यांच्या भाषणानंतर ही शीखांची भारत आणि मोदी यांच्याविरोधातील  प्रतिक्रया आहे.

युट्यूबआर्काइव 

निष्कर्ष 

या वरून स्पष्ट होते की व्हायरल होत असलेला व्हिडियो शेतकरी आंदोलनाचा नाही 2019 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जरी अद्याप कळाले नसले तरी, या व्हिडिओचा शेतकरी आंदोलनाशी काही संबंध नाही. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेयर केला जात आहे.

Avatar

Title:खलिस्तान समर्थकांचा 2019 मधील व्हिडिओ आताचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •