Fact Check : भाजपने EVM बदलले हे सांगणाऱ्या या VIDEO मागचे सत्य काय?

False राजकीय

भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी EVM बदलले आहेत, असा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

आम्ही हा व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी टीएनएन डॉट वर्ल्ड या संकेतस्थळास भेट दिली. आपण जगभरातील अनसेन्सॉर्ड बातम्या दाखवतो असा दावा या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या संकेतस्थळावर मुख्यत: भारतातील त्यातही विशेषत: लोकसभा निवडणूक निगडित बातम्या दिसून येत आहेत.  युटूयूबवरही टीएनएन डॉट वर्ल्डचा हा व्हिडिओ दिसून येतो.

या संकेतस्थळाचे ट्विटर आणि फेसबुकवर पेजही असल्याचे दिसून येते.

या व्हिडिओत नेमके जे म्हटले आहे, ते खालीलप्रमाणे आहे. “आम्हाला विश्वसनीय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे की, भाजप लोकसभेच्या निवडणूका जिंकण्यासाठी स्ट्राँग रुममध्ये असणाऱ्या EVM बदलत आहे. जर तुम्हाला देश वाचवायचा असेल तर रस्त्यावर या आणि स्ट्राँग रुमवर लक्ष ठेवा. कुठलीही चुकीची बाब आढळली तर ती अन्य राजकीय पक्षांना कळवा. देशाला मोदी-शाह यांच्यापासून वाचविणे गरजेचे आहे. भारताला वाचवा, स्वत:ला वाचवा. जय हिंद.

या व्हिडिओत जी माहिती देण्यात येत आहे, त्यासाठी कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून ते तुम्ही खाली पाहू शकता.

अक्राईव्ह

या व्हिडिओत माहिती देणारी वृत्तनिवेदिका नेमकी कोण आहे हे तपासण्याचाही आम्ही प्रयत्न केला. Kristin Stein यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट आम्ही पाहिले. त्यावर त्यांनी त्या अभिनेत्री, पत्रकार आणि सुत्रसंचालिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे संकेतस्थळ चालविणारी कंपनी कधी आणि कुठे नोंदणीकृत झाली याचा तपास केला असता त्याची नोंदणी 29 नोव्हेंबर 2018 रोजी झाल्याचे दिसून येते. त्यानंतर कंपनीच्या संचालिका म्हणून नोंद असणाऱ्या Diana Biciin या कोण आहेत हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी त्या रोमानियाच्या नागरिक असल्याचे दिसून आले. TRICOLOUR NEWS NETWORK LTD या कंपनी माहिती आम्ही companycheck.co.uk या संकेतस्थळावरही शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खाली माहिती दिसून आली.

Archived Link

Archived Link

Diana Irina Biciin याचे Facebook पेजही आपण पाहू शकता. यावरही मुख्यत: बातम्या शेअर करण्यात आल्या आहेत. कंपनी चेकच्या संकेतस्थळावर आम्ही Diana Irina Biciin याचे प्रोफाईल चेक केले तेव्हा आम्हाला खालील माहिती दिसून आली.

Archived Link

निष्कर्ष

टीएनएन डॉट वर्ल्ड या संकेतस्थळाच्या व्हिडिओत भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी EVM बदलले आहेत, याचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. या संकेतस्थळाच्या विश्वसनीयतेबद्लही प्रश्नचिन्ह आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ असत्य आढळला आहे.

Avatar

Title:Fact Check : भाजपने EVM बदलले हे सांगणाऱ्या या VIDEO मागचे सत्य काय?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False