बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जात नाहीत; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोइंम्‍बतुर येथे बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जातात. एका व्यक्तीला असे करताना पकडण्यात आले आहे. अनेक हिंदू प्रत्येक गावात अशा व्यक्तींच्या हॉटेल, गाड्यावर, स्टॉलवर आणि स्नॅक पॉईंटवर जेवणासाठी, खाण्यासाठी जातात, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे पसरत आहेत. या माहितीत काही सत्यता आहे का, कोइंम्‍बतुर येथे खरोखरच अशी काही घटना घडली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.04.25.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

कोइंम्‍बतुर येथे बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जात आहेत का? याचा शोध घेतला. त्यावेळी न्यूज 18 ने 2 मार्च 2020 कोइंम्‍बतुर येथे बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार कोइंम्बतुर पोलिसांनी बिर्याणीत गोळ्या मिसळण्यात येत असल्याचे असत्य म्हटले आहे. पोलिसांनी याबाबत ट्विट करणाऱ्या व्यक्तीलाही याबाबत समजावले. 

screenshot-www.news18.com-2020.04.25.png

न्यूज 18 चे सविस्तर वृत्त / Archive

कोइंम्‍बतुर पोलिसांनी याबाबत केलेले ट्विटही दिसून आले. 

Archive

त्यानंतर या पोस्टमधील माहितीसोबतची छायाचित्रे आली कुठून असा प्रश्न आम्हाला पडला. रिव्हर्स इमेजचा वापर करत ही छायाचित्रे नेमकी कशाची आहेत याचा शोध आम्ही घेतला.

फोटो नं.01 

पहिल्या छायाचित्राचा शोध घेतला असता streetfoodnow ब्लॉगवर असलेल्या एका युटूयूब व्हिडिओ थंबनेल म्हणून याचा वापर केला असल्याचे दिसून आला. हा व्हिडिओ 30 जुन 2016 रोजीचा आहे. 

screenshot-streetfoodnow.wordpress.com-2020.04.25.png

Archive

फोटो नं. 02-04 

त्यानंतर रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने आम्ही दुसरा आणि चौथ्या क्रमांकाचे छायाचित्र शोधले. त्यावेळी आम्हाला बरेच परिणाम मिळाले. यातील IBCTAMIL.COM या तामिळ भाषेतील संकेतस्थळावरील 2 मे 2019 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या संकेतस्थळावरील वृत्तानुसार या गर्भपाताच्या गोळ्या असून त्या श्रीलंकेची राजधानी कोलबोत जप्त करण्यात आल्या आहेत. 

image1.png

IBCTAMIL.COM / Archive

त्यानंतर PRIMENEWS.IK या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार “पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने कोलंबोमधील गोदामातून मोठ्या प्रमाणात लैंगिक उत्तेजक औषधे आणि गर्भपात करणारी औषधे जप्त केली.”  

image4.png

PRIMENEWS.IK / Archive 

फोटो नं.03

त्यानंतर गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोध घेतला. त्यावेळी 10 मार्च 2017 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, या गोळ्या नसून ही अंडी आहेत.

Archive 

निष्कर्ष

कोइंम्‍बतुर येथे बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जात असल्याची बाब असत्य आहे. कोइंम्‍बतुर पोलिसांनीही ही बाब स्पष्ट केली आहे. या माहितीसोबत वापरलेली छायाचित्रेही वेगवेगळ्या ठिकाणांवरुन संकलित करण्यात आलेली आहेत.

Avatar

Title:बिर्याणीत हिंदूंना नपुंसक बनविणाऱ्या गोळ्या मिसळल्या जात नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •