JNU विद्यार्थिनी आइशी घोषच्या उजव्या हाताला लागल्याचा फोटो खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वसतिगृहात गेल्या रविवारी झालेल्या हल्ल्यात JNUSU ची अध्यक्ष आइशी घोषला मारहाण करण्यात आली होती. यामध्ये तिच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला. डोक्यातून रक्त येत असल्याचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

सोशल मीडियावर सध्या तिच्या डाव्या हाताला मार लागला की, उजव्या हाताला यावरून शंका उपस्थित केली जात आहे. काही फोटोंमध्ये तिच्या डाव्या हाताला पट्टी दिसतेय तर, इतर फोटोंमध्ये उजव्या हाताला पट्टी बांधलेली आहे. मग खरा फोटो कोणता?  तिच्या नेमक्या कोणत्या हाताला दुखापत झाली आहे?

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ फोटो येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पोस्टमध्ये दिलेल्या फोटोंना गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून समोर आलेल्या परिणामांतून सत्य समोर आले.

सदरील फोटो जेएनयू हिंसाचार प्रकरणी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतील आहेत. यामध्ये आइशीने विद्यापीठात झालेल्या हल्ल्यासंबंधी वर्णन केले. या पत्रकार परिषदेचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये तिच्या डाव्या हातालाच पट्टी असल्याचे स्पष्ट दिसते.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकएनडीटीव्ही

या पत्रकार परिषदेचे फोटोदेखील प्रतिष्ठित न्यूज मीडिया वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यांची आणि पोस्टमधील फोटोची तुलना केल्यावर लगेच कळते की, मूळ फोटोला मिरर इमेज करून आइशीच्या उजव्या हाताला लागल्याचे दाखवले आहे.

मूळ फोटो येथे पाहा – द इंडियन एक्सप्रेसद वीक

पोस्टमधील दुसरा फोटो आइशी घोष या पत्रकार परिषदेला येतानाचा आहे. द प्रिंट वेबसाईटवर तो उपलब्ध आहे.

निष्कर्ष

आइशी घोषच्या डाव्या हाताला दुखापत झालेली आहे. तिच्य उजव्या हाताला लागल्याचा फोटो खऱ्या छायाचित्राला मिरर इमेज इफेक्ट दिलेला आहे. यावरून ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:JNU विद्यार्थिनी आइशी घोषच्या उजव्या हाताला लागल्याचा फोटो खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •