
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे परत निवडणूक जिंकले तर ते दोघे मिळून पाकिस्तानला बरबाद करून टाकतील.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताणळीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. अरविंद केजरीवाल यांनी असे वक्तव्य केले नव्हते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ शेअर केला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये युजर्स लिहिताता की, “भविष्यवाणी शंभर टक्के खरे ठरली. 2019 मध्ये संसदीय निवडणूक पूर्वी कोलकता ममता महागठबंधन पब्लिक रॅलीमध्ये अरविंद केजरीवाल आपल्या भाषणात म्हणतात की, मोदी जिंकले तर पाकिस्तान बरबाद होईल असे उघडपणे जाहीर केले.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार 19 जानेवारी 2019 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मेगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
अरविंद केजरीवालदेखील या रॅलीला उपस्थित होते. मंचावरुन भाषण देताना ते म्हणाले की, “या देशाचे तुकडे करणे हे पाकिस्तानचे स्वप्न होते. लोकांमध्ये वैर निर्माण करून आणि धर्म, भाषेच्या आधारे देशाचे विभाजन करून हे भाजप सरकार त्या दिशेने पुढे जात आहे.”
या रॅलीमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे व नेते सामील झाले होते.
अरविंद केजरीवाल यांचे संपूर्ण भाषण आपण खाली पाहू शकतात.
या व्हिडिओमध्ये 5 मिनिट 43 सेकंदावर आपण व्हायरल व्हिडिओ पाहू शकतो. केजरीवाल म्हणतात की, जर प्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा पुन्हा निवडुन आले तर हा देश (भारत) वाचणार नाही.
तसेत 4 मिनिट 53 सेकंदावर ते म्हणतात की, जे पाकिस्तान 70 वर्षांत करू शकले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाच वर्षांत करून दाखविले आहे, त्यांनी आपल्या देशाचे विभाजन केल. परंतु अरंविद केजरीवाल या क्लिपमध्ये कुठे ही “मोदी जिंकले तर पाकिस्तान बरबाद होईल,” असे म्हणताना दिसत नाही.
अर्थात अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाचा व्हिडिओ एडिटिंग करून शब्दांची फेर बदल करण्यात आली आहे.
मूळ भाषण आणि व्हायरल व्हिडिओ यांची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा जिंकले तर पाकिस्तान बरबाद होईल,” असे म्हणाले नव्हते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट–चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नरेंद्र मोदी व अमित शाहा निवडून आले तर पाकिस्तान बरबाद, असे केजरीवाल म्हटले नव्हते
Fact Check By: Sagar RawateResult: False
