Fact Check : मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करणारा व्हिडिओ जारी केलेला नाही

False सामाजिक

मुंबई पोलीस आयुक्ताचे आवाहन प्रत्येक नागरिकाने काळजी पूर्वक ऐकावे, असे सांगणारा एक व्हिडिओ Prashant Dahale यांनी पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी असे काय आवाहन केले आहे का, याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी आम्हाला असे वृत्त दिसून आले नाही. आम्ही व्हिडिओतील व्यक्ती आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या चेहऱ्याची तुलना केली त्यावेळी या दोन व्यक्ती वेगळ्या असल्याचे दिसून आले.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुंबईतील जनजीवन सुरळित सुरु आहे. आम्ही असा कोणताही व्हिडिओ अथवा हाय अलर्ट जारी केलेला नाही.

मग ही व्यक्ती कोण, असा प्रश्न आम्हाला पडला. आम्ही  InVidTool च्या मदतीने स्क्रीन शॉट घेत यांडेक्स इमेज सर्च द्वारे शोध घेतला. त्यावेळी ही व्यक्ती म्हणजे सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन असल्याचे दिसून आले.

 त्यानंतर आम्ही गूगल वर ‘Brigadier hemant Mahajan Rtd’ कीवर्ड्स शोध घेतला. सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे संरक्षण विषयावर लिखाण करत असल्याचे आम्हाला दिसून आले.

सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या ब्लॉगवर व्हिडिओ देखील दिसून आले. 

BrigHemantMahajan.blogspot.com | ArchivedLink

आम्ही व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि ब्लॉग व्हिडिओ याचा तुलनात्मक अभ्यास केला असता या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे दिसून आले. 

सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा सुरक्षा विषयक व्हिडिओ पाहिल्यावरही हे स्पष्ट होते की, व्हिडिओतील व्यक्ती ही ब्रिगेडियर महाजन आहेत. हा व्हिडिओ पोलीस आयुक्तांनी जारी केला नसल्याचेही स्पष्ट होते. हा व्हिडिओ चुकीच्या माहितीद्वारे पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी हा व्हिडिओ आपला नसल्याचे स्पष्ट केले आहे. सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येते. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करणारा व्हिडिओ जारी केलेला नाही

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False