वंदेमातरम हे राष्ट्रविरोधी असल्याचे पत्रकार राहुल कंवल यांनी म्हटलंय का?

False राजकीय

समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ क्लिप पसरत आहे. अवघ्या 20 सेकंदाच्या या क्लिपच्या आधारे दावा करण्यात येत आहे की, पत्रकार राहुल कंवल यांनी वंदमातरम म्हणणे हे राष्ट्रविरोधी असल्याचे वक्तव्य केले आहे. निलेश शेट्टी यांनीही असाच दावा करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive 

तथ्य पडताळणी

पत्रकार राहुल कंवल यांनी खरंच असे काही विधान केले आहे का? केले असल्यास त्यांचे याबाबत काय म्हणणे आहे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम राहुल कंवल यांच्या ट्विटर खात्यास भेट दिली. या ठिकाणी राहुल कंवल यांनी केलेले एक ट्विट आम्हाला दिसून आले. या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय यांचे भाषांतर पुढीलप्रमाणे आहे. त्यांनी म्हटलंय की, इंडिया टूडेच्या एसआयटी टीमने वकीलांचे सत्य समोर आणले. त्यांनी कॅमेऱ्यासमोर कबुल केले की, त्यांनी कन्हैय्याकुमारला मारहाण केली. पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. कन्हैय्याकुमारवर हल्ला करताना वकिलांनी वंदेमातरमच्या घोषणा दिल्या. कोणावर हल्ला करणे आणि वंदेमातरमच्या घोषणा देणे राष्ट्रविरोधी आहे. त्यावेळी ही म्हटलो होतो आणि आताही म्हणेल. जय हिंद.

https://twitter.com/rahulkanwal/status/121669326660888hi1664

Archive

त्यानंतर आम्हाला युटूयूबवर इंडिया टूडेद्वारे अपलोड करण्यात आलेला पूर्ण  व्हिडिओ देखील दिसून आला. या व्हिडिओच्या शीर्षकात लिहिले आहे की, पटियाला हाऊस कोर्टाच्या बाहेर वकिलांकडून करण्यात आलेली गुंडगिरी. या व्हिडिओच्या खाली देण्यात आलेल्या माहितीत वकिलांच्या एका समूहाने पटियाला हाऊस कोर्टाच्या बाहेर गुंडगिरी केली. जेएनयूएसयू अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्यावर हल्ला केला. यातील व्हायरल करण्यात आलेला भाग आपण 13 मिनिटे 50 व्या संकेदाला पाहू शकता.

Archive

या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, राहुल कंवल एका चर्चेचे सुत्रसंचालन करत आहेत. यात चर्चेत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता राजीव यादव आहेत. सर्वोच्च न्यायालय 2016 मध्ये जेएनयू प्रकरणात सुनवाई करत असताना यादव यांनी न्यायालयात वंदेमातरमच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर यादव यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाहेर नेले होते. त्यानंतर त्यांना याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची माफी सुध्दा मागावी लागली होती. इंडिया टुडेच्या या चर्चेत यादव यांनी आपल्या घोषणा देण्याच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे होते की, कन्हैय्याकुमारचे वकील एका देशद्रोहीचा बचाव करत आहेत. त्यावर राहुल कंवल काय म्हणाले है आपण खाली पाहू शकतो. 

Rahul Kanwal– “lekin isike liye to judge hai na sir, judge decide karenge na kaunsa issue sahi hai ya kaunsa lawyer galat hai. Aap uske liye court mein argue kijiye, aap Prashanth Bhushan se argue kijiye court mein. Aap aise nare bazi kyon kar rhe hai, aap ekdum anti National activity aap kyon kar rhe hai, anti-legal activity aap kyon kar rhe hai? Jo aapne kiya main aarop lagata hun aappe ki jo aapne kiya wo Anti National hai. Vande Mataram ke naarein lagaye wo Anti National activity hai sir.

Rajeev Yadav- “sir, Vande Mataram kehna koi Anti -National Activity nhi hai.”

Rahul Kanwal – “Court ke andar lagana, court ki garima ko kharab karna hai, wo ekdum galat hai. Desh ki garima ko choot pahunchati hai. Yeh kaam galat hai aapka.”

मराठी अनुवाद-

राहुल कंवल- या गोष्टीसाठी न्यायाधीश आहेत. एक न्यायाधीश निर्णय घेईल की कोणता मुद्दा योग्य आहे, कोणता वकील अयोग्य आहे. तुम्ही यावर न्यायालयात प्रतिवाद करा. तुम्ही प्रशांत भूषण यांच्यासोबत याबाबत प्रतिवाद करु शकता. तुम्ही या पध्दतीने घोषणा का देता? तुम्ही देशविरोधी कृत्य का करत आहात? तुम्ही कायदा विरोधी कृत्य का करत आहात? मी आरोप लावला की आपन जे केले ते राष्ट्रविरोधी आहे. तुम्ही वंदेमातरमच्या घोषणा दिल्या, हे देशविरोधी कृत्य आहे.

राजीव यादव- “सर, वंदेमातरम म्हणणे कोणतेही देशविरोधी कृत्य नाही.

राहुल कंवल- न्यायलयात अशा घोषणा, न्यायालयाच्या सन्मान राखत नाही, ही बाब एकदम अयोग्य आहे. ही बाब देशाच्या सन्मानासही बाधा आणते. तुमचे हे काम पुर्णपणे चुकीचे आहे

यातुन ही बाब स्पष्ट होत आहे की, पुर्ण चर्चेतील ठराविक भाग काढून तो चुकीच्या माहितीसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे. प्रत्यक्षात ते न्यायालयात घोषणाबाजी करणे अयोग्य असल्याचे सांगत आहेत. 

खाली आपण व्हायरल क्लिप आणि मूळ व्हिडिओची तुलना पाहू शकता.

निष्कर्ष

पत्रकार राहुल कंवल यांनी वंदेमातरम म्हणणे राष्ट्रविरोधी असल्याचे मत व्यक्त केलेले नाही. त्यांनी न्यायालयात घोषणाबाजी करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. समाजमाध्यमात त्यांच्या याबाबतच्या चर्चेचा काही भाग टाकून संभ्रम पसरविण्यात आहे.

Avatar

Title:वंदेमातरम हे राष्ट्रविरोधी असल्याचे पत्रकार राहुल कंवल यांनी म्हटलंय का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False