फेसबुकवर भाजपा प्रसन्न : सत्य पडताळणी

True अर्थव्यवस्था राजकारण | Politics
 • 28
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  28
  Shares

जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय पक्षांच्या प्रचारानेही वेग घेतला आहे. जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने राजकीय जाहिरातींचा डेटा जाहीर केला आहे. यात जाहिरातींवर खर्च करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक रक्कम भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्थानिक पक्षानंतर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा क्रमांक लागतो, असे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे. याबाबत फॅक्ट क्रिसेंडोने सत्य पडताळणी केली आहे.

फॅक्ट क्रिसेंडोने पडताळणी करेपर्यंत लोकसत्ताच्या फेसबुकवरील पोस्टला 143 शेअर आहेत. या पोस्टवर 22 कमेंटस् आणि 420 लाईक्स आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

तथ्य पडताळणी

फेसबुकवर भाजपने सर्वात जास्त जाहिरातींसाठी रक्कम खर्च केली आहे. या विषयावर द इंडियन एक्स्प्रेसनेही वृत्त प्रकाशित केले आहे.

The Indian Express l अर्काईव्ह

अन्य संकेतस्थळावरही याबाबतचे वृत्त दिसून येत आहे.

Mean Web Bhost l अर्काइव्ह

द इकोनॉमिक टाईम्सनेही याबाबतचे वृत्त दिले आहे.

The Economic Times l अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणा-या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, फेसबुकने स्वत:च याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. फेसबुकवर असणारा राजकीय जाहिरातींचा डेटा शोधण्यासाठी आम्ही गुगलवर Facebook Ad Library report असे शोधल्यानंतर खालील बाबी समोर आल्या.

त्यानंतर Ad Archive Report – Facebook या लिंकवर क्लिक केल्यानंतर खाली दिलेला अहवाल समोर आला. याठिकाणी फेसबुककडून राजकीय जाहिरातींचा डेटा जाहीर करण्यात आला आहे.

फेसबुकवर राजकीय पक्षांनी केलेला जाहिरातींचा खर्च फेसबुकने स्वत: Ad Library report या विभागात दिला आहे.

फेसबुक रिपोर्ट़ l अर्काईव्ह

निष्कर्ष :  फेसबुकवर राजकीय जाहिरातींसाठी भाजपने सर्वाधिक खर्च केल्याचे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत दिसून आले आहे. त्यामुळे हे वृत्त खरे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Avatar

Title:फेसबुकवर भाजपा प्रसन्न : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True


 • 28
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  28
  Shares