‘स्टीम ड्राईव्ह’मुळे कोरोना नष्ट होत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Coronavirus False

गरम वाफेद्वारे कोविड-19 विषाणू नाक-तोंडामध्ये मारता येऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याआधारे कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी ‘स्टीम ड्राइव्ह’ अशी मोहिम सुरू करण्याचीही मागणी केली जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता, ही माहिती असत्य असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

screenshot-www.facebook.com-2020.09.03-18_30_50.png

फेसबुक पोस्ट ।  संग्रहित

तथ्य पडताळणी 

आठवडाभर गरम वाफ घेतल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? ‘स्टीम ड्राईव्ह’ म्हणजे काय? याविषयी जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला. 

“गरम वाफ दीर्घकाळ घेतल्याने कोरोना विषाणू नष्ट होत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी माहिती दिली की, कोरोनाचे विषाणू श्वासाद्वारे घशातून पातळ पडद्यातून पेशींमध्ये उतरतात व त्याचे पुनरुत्पादन होते.  त्यामुळे गरम वाफ घेतली तरी ते नष्ट होत नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा गरम वाफेने कोरोना विषाणू नष्ट होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. गरम पाण्याची वाफ घेणे हा कोविड-19 वरील उपचार नाही. त्याने कोरोना बरा किंवा त्याचा विषाणू नष्ट होत नाही. वाफ कितीही गरम असली तरी पेशींमध्ये असणाऱ्या कोरोना विषाणूपर्यंत ती पोहचू शकत नाही. उलट वाफेमुळे चटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा उपायांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन संघटनेने केले आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकसंग्रहित

आकाशवाणीने 9 ऑगस्ट 2020 रोजी याबाबत केलेले एक ट्विट आढळले. यातही गरम पाणी अथवा पेय पिल्याने कोरोना विषाणू नष्ट होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “गरम पाणी पिल्याने किंवा इतर कोणतेही गरम पेय घेतल्याने कोरोनाचे संक्रमण होणार नाही, असे म्हणता येत नाही. वाफेमुळे सर्दी-पडसं किंवा घसा बसला असेल तर ठीक होऊ शकतो,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

संग्रहित

निष्कर्ष

आठवडाभर गरम वाफ घेतल्याने कोरोना विषाणू नष्ट होत असल्याचा दावा खोटा आहे. वाफेमुळे कोरोनाचे संक्रमण रोखता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ‘स्टीम ड्राईव्ह’विषयी व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काही तथ्य नाही.

Avatar

Title:‘स्टीम ड्राईव्ह’मुळे कोरोना नष्ट होत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False