FAKE NEWS : आदित्य ठाकरे यांना HIV-AIDS झाल्याची बातमी खोटी; वाचा सत्य

False राजकीय

राज्याचे पर्यावरण व पर्यटण मंत्री आदित्य ठाकरे यांना HIVAIDS ची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. टीव्ही- भारतवर्ष चॅनेलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून तसा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत ही बातमी खोटी आढळली. टीव्ही-9 भारतवर्ष वाहिनीचा हा स्क्रीनशॉट बनावट (मॉर्फ्ड) आहे.

काय आहे दावा?

टीव्ही-9 भारतवर्ष वाहिनीच्या नावाने सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये म्हटले आहे की, “सीएम उद्धव के बेटे आदित्य ठाकरे HIV/AIDS पॉजिटिव”

मूळ ट्विट – ट्विटर | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तपासले की, टीव्ही-9 भारतवर्षने अशी बातमी दिली आहे का. कीवर्ड सर्चद्वारे लगेच कळाले की, सदरील स्क्रीनशॉट बनावट आहे.

टीव्ही-9 भारतवर्षने 20 मार्च 2021 रोजी बातमी दिली होती की, आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर या बातमीचा व्हिडिओ उपलब्ध आहे. मूळ बातमीत म्हटले आहे की, “सीएम उद्धव के बेटे आदित्य ठाकरे कोरोना पॉजिटिव”

या बातमीचा स्क्रीनशॉट खोडसाळपणे एडिट करून “कोराना” शब्दाच्या जागेवर “HIV/AIDS”  असे टाकण्यात आले. मूळ बातमी आणि व्हायरल स्क्रीनशॉट यांची तुलना केल्यावर दोन्हींमधील फरक लगेच लक्षात येतो.

आदित्य ठाकरे यांनी 20 मार्च रोजी स्वतः ट्विट करून सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी ट्विट केले की, “माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.”

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, आदित्य ठाकरे यांना HIV/AIDS ची लागण झाल्याची बातमी खोटी आहे. खोडसाळपणे मूळ बातमीचा स्क्रीनशॉट एटिड करून चुकीची बातमी पसरविली जात आहे. आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Avatar

Title:आदित्य ठाकरे यांना HIV-AIDS झाल्याची बातमी खोटी

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False