महिलांसाठी सुरु करण्यात आलेला हेल्पलाईन नंबर सध्या काम करतो का?

False सामाजिक

संग्रहित छायाचित्र

सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महानगर टेलीफोन निगम यांच्याकडून लांब अंतराच्या प्रवासाच्यावेळी टॅक्सी किंवा रिक्षात बसल्यानंतर 9969777888 या हेल्पलाईन नंबरवर टॅक्सी किंवा रिक्षाचा क्रमांक एसएमएस केल्यानंतर पोलिसांच्या क्रमांकाशी हेल्पलाईन क्रमांक जोडलेला आहे. या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही समस्या निर्माण झाल्यानंतर ट्रेसमध्ये राहू शकता असा दावा करण्यात आलेला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

सोशल मीडियावर असणाऱ्या या पोस्टसंदर्भात सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर सर्च केले. एमटीएनएल या वेबसाईटवर महिलांसाठी सुरु करण्यात आलेला कोणताही हेल्पलाईन नंबर या साईटवर सध्या आढळून येत नाही. परंतू 2014 मध्ये मुंबई पोलीस विभागाकडून महिलांसाठी लांब पल्ल्याच्या अंतरासाठीच्या प्रवासासाठी एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला होता. यासंदर्भातील बातमी आपण येथे पाहू शकता.

The Indian express l अर्काईव्ह

2014 या वर्षी मुंबई पोलीस आणि एमटीएनएल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 9969777888 हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला होता. याविषयी मुंबई पोलीस अधिकारी धर्मेश ठक्कर यांनी ट्विटरवर केलेले ट्विट आपण खाली पाहू शकता.

पोस्टमध्ये देण्यात आलेल्या हेल्पनंबरवर आपण सध्या फोन लावल्यानंतर हा नंबर अस्तित्वात नाही असे येते. त्यामुळे 2014 या वर्षी सुरु झालेला हेल्पलाईननंबर नंतर कधी बंद पडला हे शोधले असता 2017 मध्ये अत्यंत कमी प्रतिसादाच्या कारणामुळे हा हेल्पलाईन नंबर बंद केला.

MID DAY l अर्काईव्ह

मुंबई पोलीसांच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या एक वेगळाच नंबर हा हेल्पलाईन नंबर म्हणून सुरु करण्यात आलेला आहे. हा नंबर आहे 103.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मधील हेल्पलाईन नंबर बाबतीत दिल्ली पोलीसांनी देखील अशा प्रकारचा कोणताही हेल्पलाईन नंबर सुरु नाही असे ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये देण्यात आलेला 9969777888 हा लांब पल्ल्याचा अंतरासाठी महिलांसाठी हेल्पलाईन नंबर असत्य आहे.

Avatar

Title:महिलांसाठी सुरु करण्यात आलेला हेल्पलाईन नंबर सध्या काम करतो का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False