ATM पिन उलटा टाईप केल्यास पोलीस येऊन लुटीपासून बचाव होतो का? वाचा सत्य

False सामाजिक

Representational Image: Photo: Pixabay

प्लीज हे वाचा…ATM बद्दल थोडसं…पण खूप महत्त्वाचे…असे सांगत सध्या समाजमाध्यमात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये ATM चा पिन उलटा टाईप केल्यास एटीएम मशीनला कळते की, तुम्ही अडचणीत आहात.     त्यानंतर एटीएममधून अर्धेच पैसे बाहेर येतील. एटीएम मशीन बँकेला आणि पोलिसांना सुचना देईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांना पण सांगा, From Mumbai Police असे या मेसेजच्या शेवटी म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

एटीएमच्या वापराबाबत मुंबई पोलिसांनी खरोखरच अशी काही सुचना केली आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी बँकिंग व्यवहाराबाबत खबरदारी घेण्याविषयी माहिती दिसून आली पण मेसेजमध्ये दावा केलेली कोणतीही माहिती दिसून आली नाही. त्यानंतर आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळास भेट दिली. त्याठिकाणीही अशी कोणतीही माहिती आम्हाला दिसून आली नाही. आमचा तपास आणखी पुढे नेला त्यावेळी आम्हाला झी बिझनेस या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार हा मेसेज खोटा आहे. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांनी या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

screenshot-www.zeebiz.com-2020.02.17-12_51_07.png

झी बिझनेसच्या संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

या व्यतिरिक्त जगभरात अशा प्रकारचे ई-मेलद्वारेही पाठवले जात असल्याने त्याबाबत ब्रिटनच्या पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरणही आम्हाला दिसून आले. ही माहिती असत्य असल्याचे ब्रिटनच्या पोलिसांनी म्हटले आहे.

screenshot-www.north-wales.police.uk-2020.02.17-13_13_29.png

नॉर्थ-वेल्स पोलिसांचे संकेतस्थळ / Archive

द इकोनॉमिक्स टाईम्सने 2011 मध्ये दिलेल्या वृत्तानुसार एटीएममध्ये पिन नंबर उलट टाकल्यास पोलीस येतात, ही बाब असत्य असल्याचे स्पष्टीकरण बँकांनी वेळोवेळी दिल्याचे दिसून येते. brainbuxa.com या संकेतस्थळाने हा मेसेज असत्य असल्याचे म्हटले आहे.

screenshot-economictimes.indiatimes.com-2020.02.17-13_31_07.png

द इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेले वृत्त / Archive

निष्कर्ष

ATM पिन उलट टाकल्याने पोलीस येतात आणि लुटीपासून तुमचा बचाव होतो ही बाब असत्य आहे. बँकांनीही याबाबत वेळोवेळी खुलासा केलेला आहे. जगभरात वेगवेगळ्या माध्यमातून ही अफवा पसरलेली आहे. 

Avatar

Title:ATM पिन उलटा टाईप केल्यास पोलीस येऊन लुटीपासून बचाव होतो का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False