कोरोना काळात या मूर्तींचे विलगीकरण करण्यात आलेले नाही; वाचा सत्य

Coronavirus False राजकीय | Political

कोरोना काळात काही मूर्तींचे विलगीकरण करण्यात आले, अशा दाव्यासह एक छायाचित्र व्हायरल होत आहे. देवानांही कोरोनाची बाधा झाल्याचे याद्वारे म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा फोटो गेल्यावर्षीचा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

Corona God claim.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

हे छायाचित्र कोरोना काळातील किंवा कोरोनाशी संबंधित आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी ते भारतातील नसून रशियातील समाजमाध्यमात 2019 पासून उपलब्ध असल्याचे दिसून आले. 

image4 T.png

Vk.com

हा व्हिडिओ युटूयूबवरही 26 जुलै 2019 रोजी अपलोड केला असल्याचे दिसून आले. 

संग्रहित  

 समाजमाध्यमात व्हायरल होत असलेल्या छायाचित्रातील आणि व्हिडिओतील व्यक्ती एकच असल्याचे आपण खाली पाहू शकता. 

image3 T.png

या ठिकाणी लिहिलेली रशियन भाषेतील माहितीनुसार हे सुट्टीतील श्री पंचतत्त्वाचे दर्शन आहे. हरे राम हरे कृष्णा या भक्ती चळवळीवर आधारित या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले येते आणि या पाच मूर्तींना पंचतत्व समजून त्याची हे भाविक पूजा करतात. याशिवाय पंचतत्व मूर्ती पुजेची माहिती देणारे अनेक व्हिडिओ देखील युटूयूबवर उपलब्ध आहेत.

संग्रहित 

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, सदरील फोटोंचा कोरोनाशी काही संबंध नाही. हे रशियातील गेल्या वर्षीचे फोटो आहेत. 

Avatar

Title:कोरोना काळात या मूर्तींचे विलगीकरण करण्यात आलेले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False