Fact : हा व्हिडिओ आसाममधील असल्याचा दावा खोटा

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

देशाच्या अन्य भागातील माहिती नाही पण आसाममध्ये NRC मध्ये नाव नसल्याने घरातून कसे उचलून नेले जात आहे, हे या व्हिडिओतच पाहा. तुम्ही आज विरोध बंद केल्यास तुमचेही उद्या असेच हाल होणार आहेत. उत्तर पुर्वेकडील राज्यात लोक का विरोध करत आहेत, हे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलेच असेल, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. मुगल मुबारक यांनीही अशाच माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहिला त्यावेळी आम्हाला या बसवर KA19F3250 असा क्रमांक दिसून आला. 

image2.jpg

आम्ही हा क्रमांक vahan.nic.in या संकेतस्थळावर शोधला. हा क्रमांक आम्हाला कर्नाटकातील पुत्तूर या शहरात नोंदणीकृत झाला असल्याचे दिसून आले. 

image3.jpg

त्यानंतर हे शहर नेमके कुठे आहे याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी हे शहर कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असल्याचे आम्हाला दिसून आले. त्यानंतर आम्ही दक्षिण कन्नड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक बी. एम. लक्ष्मीप्रसाद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा व्हिडिओ पाहून आम्हाला सांगितले की, हा मंगळुरूमधील घटनेचा आहे. हा व्हिडिओ ट्विटरवरही पसरविण्यात आलेला आहे. त्यांनी दक्षिण पोलीस ठाण्यातून तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती मिळेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर आम्ही दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सागितले की, मंगळुर शहराच्या सीमेवर असलेल्या स्टेट बँक सर्कल भागात 19 डिसेंबरला ही घटना घडली. CAA विरोधातील आंदोलन हिंसक झाल्यावर पोलिसांनी लाठीमार केला होता. व्हिडिओत दिसणारी व्यक्तीही या हिंसक आंदोलनात सामील होती. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी तो आपल्या पत्नी आणि मुलांना पुढे करत होता. आम्ही त्याला अटक केली नाही. त्याला कडक समज दिली. त्यानंतर तो कासारागोड या आपल्या गावी निघुन गेला. या घटनेचा NRC मध्ये नाव नसल्याशी संबंध नाही.

या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, हा व्हिडिओ कर्नाटकातील मंगळुरू येथील आहे. त्याचा NRC मध्ये नाव नसण्याशी कोणताही संबंध नाही. हा व्हिडिओ चुकीच्या माहितीसह पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष 

आसाममध्ये NRC मध्ये नाव नसल्याने नागरिकांना अटक करण्यात येत असल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Avatar

Title:Fact : हा व्हिडिओ आसाममधील असल्याचा दावा खोटा

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •