‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुराच्या पाण्याने वेढल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

False सामाजिक
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

नर्मदा नदीला आलेल्या पुराने गुजरातमध्ये केवडिया येथे उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याला अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला वेढल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हा पुराच्या पाण्याने पुतळ्याला वेढल्याचा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

नर्मदा नदीच्या पुराने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला वेढल्याचा या व्हिडिओविषयी जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आम्ही नुकताच नर्मदा नदीला पुर आला होता का, याचा शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त दिसून आले. त्यानंतर सरदार सरोवर प्रकल्पाच्या संकेतस्थळावरही अशी माहिती आढळली नाही. त्यानंतर देश गुजरात या युटूयूब चॅनलवर 16 सप्टेंबर 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओ खाली देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

संग्रहित

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2019 रोजी केलेले एक ट्विट दिसून आले. त्यात त्यांनी आपण थोड्याच वेळापूर्वी आपण केवडिया येथे पोहचलो. हा तोच व्हिडिओ आहे जो सध्या समाजमाध्यमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुराच्या पाण्याने वेढले असल्याचा म्हणून व्हायरल होत आहे. 

संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुराच्या पाण्याने वेढल्याचा हा व्हिडिओ गतवर्षीचा म्हणजेच 2019 मधील आहे. त्याला सध्या पाण्याने वेढल्याचा दावा असत्य आहे.

निष्कर्ष

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला सध्या पुराच्या पाण्याने वेढले असल्याचा दावा असत्य आहे. हा व्हिडिओ जुना म्हणजेच 2019 मधील आहे.

Avatar

Title:‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुराच्या पाण्याने वेढल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply