भारत-चीन सीमेवरील तणावाचा हा व्हिडिओ जुना, वाचा सत्य

False राष्ट्रीय सामाजिक
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराचे जवान कर्तव्य बजावत असताना दगडी भिंतीचे संरक्षण करत होते. त्यावेळी चिनी सैनिकांनी दगडी भिंतीचे नुकसान करण्यास सुरूवात केली. त्यांना भारतीय सैनिकांनी रोखले. भारत-चीन सीमेवरील तणाव अजुन कायम असून काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. खुरापती करणारे 43 चिनी सैनिक मारले गेले, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ शेअर होत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

भारत-चीन सीमेवर सध्या असलेल्या तणावाचा हा व्हिडिओ आहे का? हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक द्दश्य घेत ते रिव्हर्स सर्च केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात इंडिया न्यूज या वृत्तवाहिनीने 24 ऑगस्ट 2014 रोजी त्यांच्या युटूयूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला असल्याचे दिसून आले. त्यावेळी भारत-चीन सीमेवर झालेल्या घटनेचा हा व्हिडिओ असल्याचे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

संग्रहित

त्यानंतर झी न्यूज या वृत्तवाहिनीनेही 24 ऑगस्ट 2014 रोजी याबाबतचे वृत्त दिले असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकतो.

संग्रहित

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, भारत-चीन सीमेवरील तणावाचा हा व्हिडिओ सध्याचा म्हणजेच 2020 मधील असल्याचे असत्य आहे. हा व्हिडिओ सहा वर्षापुर्वीचा म्हणजेच 2014 मधील आहे.

Avatar

Title:भारत-चीन सीमेवरील तणावाचा हा व्हिडिओ जुना, वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply