Fact Check : खंबाटकी घाटातील जुना व्हिडिओ अन्य गावांच्या नावाने होत आहे व्हायरल

False सामाजिक

खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील पावसाळ्यातील नजारा अशी माहिती
Santosh B Shelke आणि Shahaji Gaware यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओ आम्ही नीट पाहिला असता आम्हाला यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीची एशियाड बस यामध्ये दिसून आली. हे व्हिडिओतून घेण्यात आलेले छायाचित्र आपण खाली पाहू शकता.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अशी कोणतीही सेवा या भागात असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. या ठिकाणी मध्य प्रदेश परिवहन महामंडळाच्या एमपीआरटीसीच्या बसेस धावत असल्याचे आम्हाला दिसून आले. त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी दिव्य मराठीच्या संकेतस्थळाने 17 जून 2017 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात पूरस्थिती निर्माण झाली होती. या वृत्तात या व्हिडिओतील छायाचित्र वापरल्याचेही आपण पाहू शकता.

दिव्य मराठी / Archive

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळानेही 17 जून 2017 रोजी वृत्त देताना हे पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंबाटकी घाटातील दृश्य असल्याचे म्हटले आहे. या घटनेचे व्हिडिओही या वृत्तासोबत देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पुणे ते सातारा दरम्यान सहापदरीकरणाचे काम करत असताना करण्यात आलेल्या मोरीतून हे पाणी वाहून आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

एबीपी माझा / Archive

निष्कर्ष 

खंडवा इंदौर महामार्गावरील भैरू घाटातील म्हणून पसरविण्यात येत असलेला हा व्हिडिओ पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंबाटकी घाटातील आहे. तो 2017 मधील असून फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत याबाबतची पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : खंबाटकी घाटातील जुना व्हिडिओ अन्य गावांच्या नावाने होत आहे व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False